धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

आता आलेल्या अहवालात 19 रूग्ण बाधित आढळले आहेत. दररोज वाढत्या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्याची शतकाकडे वाटचाल सुरू झाल्याने चिंता आणि धोका वाढला आहे

जळगाव : जिल्ह्यातील "कोरोना'बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज दिवसभरात दोन अहवाल प्राप्त झालेत त्यात एकूण 24 रूग्ण कोरोना बाधित आढळले. सायंकाळी आलेल्या अहवालात चार रूग्ण बाधित होते तर आता आलेल्या अहवालात 19 रूग्ण बाधित आढळले आहेत. दररोज वाढत्या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्याची शतकाकडे वाटचाल सुरू झाल्याने चिंता आणि धोका वाढला आहे. 

जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Shocking: Another 19 "corona-infested!"