सर्प मित्रांनी...विहरीत अडकलेल्या दोन कोब्रा सर्पांना दिले जीवनदान ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 एप्रिल 2020

चिंचोली येथे शेतातील विहिरीत इंडियन कोब्रा जातीचे सर्प जखमी असल्याची माहिती शेतकऱ्याने संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके, विनोद सोनवणे यांना दिली माहिती दिली. सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी पोहचले. विहिरीत एक कोब्रा अतिशय थकलेल्या अवस्थेत पडलेला दिसला.

जळगाव :  चिंचोली (ता.जळगाव) येथील एका शेतातील विहीरीत 4 इंडियन कोब्रा जातीचे सर्प जखमी अवस्थेत आज सकाळी पडलेले असल्याचे होते. सर्पमित्रांनी तत्काळ धाव घेत सर्पांना काढून जळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. परंतू चार पैकी दोन कोब्रा वाचविण्यात डॉक्‍टरांना यश तर अतिशय जखमी झालेल्या दोन कोबरांचा यात मृत्यू झाला. 

जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे वन्यजीव संरक्षण संस्थेस सेवाभावी संस्था म्हणून संस्थेच्या ठराविक सर्पमित्रांना संचारबंदीच्या काळात नागरी रहिवासात, निघालेले सर्प वाचवणे, आणि नागरिकांना देखील सर्पदंश होऊ नये म्हणून सहकार्यकरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार आज आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चिंचोली येथे शेतातील विहिरीत इंडियन कोब्रा जातीचे सर्प जखमी असल्याची माहिती शेतकऱ्याने संस्थेचे सर्पमित्र प्रदीप शेळके, विनोद सोनवणे यांना दिली माहिती दिली. सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी पोहचले. विहिरीत एक कोब्रा अतिशय थकलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. त्याची शरीर रचना बघता हा नाग वयोवृद्ध असल्याचे जाणवले आणि शरीरावर जखम देखील दिसली सदर कोब्रा पकडत असतांना जवळच दुसरा नाग दिसून आला. हे दोन्ही नाग पैकी एका नागाचा अवयव बाहेर आलेला दिसून आला सदर भाग त्या कोब्राचे हेमीपेनिस झाल्याचे आले. 

अजून दोन कोब्रा आढळले 
शेतातील ही जागा विहिरीची असल्याने ओलावा आणि थंडगार वातावरण आहे त्यात सर्पांचा प्रणायकाळ सुरू असल्याने या पोषक वातावरणात अजून सर्प असू शकतात म्हणून शोध घेतला. याच ठिकाणी अजून 2 कोब्रा दृष्टिस पडले या विहीरीची स्थिती बघता विहिरीच्या आजूबाजूला खोदकाम झालेले दिसून आले त्या दगडांमध्ये वरील कोब्रा अडकलेले होते सर्पमित्र शेळके आणि सोनवणे यांनी मोठ्या शिताफीने सदर कोब्रा बाहेर काढले. 

गंभीर जखमी दोन कोबरांचा मृत्यू 
4 जखमी कोब्रावर उपचारासाठी वन्यजीव संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांना कळवीले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय गायकवाड आणि डॉ मनीष बाविस्कर यांनी तत्काळ चारही कोब्रा आणण्याचे सांगितले. जळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहचण्यापूर्वी अतिशय गंभीर जखमी दोन कोब्राचे वाटेतच मृत्यू झाला. तर 2 कोब्रा वाचविण्यात सर्पमित्र व डॉक्‍टरांना यश आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Snak friends gave life to two cobra snakes trapped in a well