"लालपरी' पडताय अपूर्ण ! 

"लालपरी' पडताय अपूर्ण ! 

जळगाव : ग्रामीण भागासाठी जिवनवाहिनी ठरणारी "लालपरी' सर्व सामान्यांना परवडणारी आहे. परंतु या लालपरीची कमतरता जाणवत असल्याने अनेक फेऱ्या कोणत्या ना कारणांमुळे रद्द कराव्या लागतात. जळगाव विभागात 870 बस असून आणखी शंभर बसची गरज आहे. याबाबत जळगाव विभागाने मुंबई येथील वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविला असताना देखील बस देण्यास विलंब होत आहे. एकीकडे बसचा दर्जा सुधारत असताना दुसरीकडे प्रशासनच बस देण्यास उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करत आहे. 
महामंडळापुढे प्रवासी मिळवून आपले उत्पन्न वाढविण्यासाठीची एक कसोटी असते. त्यातच महामंडळाने गेल्या दोन वर्षांपूर्वी आरामदायी शिवशाही स्लिपर कोचची सुविधा सुरू केली. परंतु शिवशाहीचे भाडे परवडणारे नसल्याने त्यांच्या रूपाने पांढरा हत्ती पोसण्याची वेळ महामंडळावर आली आहे. तर ज्या बसमधून उत्पन्न मिळू शकते; अशाच बसची आवश्‍यकता असताना उपलब्ध केल्या जात नाही. एसटी म्हणजे लालडबा हे समीकरण ग्रामीण भागासह आजही कायम टिकून आहे. सरकार कुठलेही असो; एसटी महामंडळाला मात्र त्याचा फटका सोसावा लागतोय. कारण एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला चांगल्या सुविधा आणि सेवा मिळत नसल्याने बहुतांश प्रवासी हे खासगी गाड्यांमधून प्रवास करत असतात. यामुळे महामंडळाचा तोटा भरून निघत नाही. 

लालपरी झाली खिळखिळी 
जळगाव विभागात 870 बस धावत असून दिवसाला साधारण 70 लाखाप्रर्यंत उत्पन्न विभागाला मिळते. रस्त्याची दुरवस्था बघता विभागाला एका दिवसाला 10 लाखांचा फटका बसत आहे. रस्ते खराब असल्याने बस वेळेत पोहचत नाही, यातून प्रवाशांना वेळेत पोहचता येत नसल्याने त्यांची नाराजी वाढली आहे. खराब रस्त्यांचा फटका लालपरीला बसत आहे. अगोदरच खिळखिळ्या असलेल्या बस खराब रस्त्यावरून धावताना जास्तच खिळखिळ्यात होत आहे. यामुळे दुरुस्तीचा खर्च देखील वाढला आहे. स्पर्धेच्या युगात लालपरी आपले अस्तित्व टिकून आहे. मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने लालपरीचे कंबरडे मोडले आहे. 

केवळ चौदाच बस आल्या 
जळगाव विभागातील अकरा आगारांमधून ग्रामीण भागासह प्रत्येक तालुक्‍यासाठी शटल फेऱ्या सुरू आहे. या फेऱ्यामुळे विभागात असलेल्या बस अपूर्ण पडत आहेत. कारण एकूण बसमधील दहा- पंधरा बस या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दाखल असतात. यामुळे फेऱ्या देखील रद्द होत असतात. विभागासाठी शंभर बसचा प्रस्ताव देण्यात आला असून, यातील केवळ चौदा बस प्राप्त झाल्या आहेत. 


जळगाव विभागासाठी नवीन शंभर बसचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यातील चौदाच बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आणखी बस मिळण्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. 

- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, रा. प. महामंडळ जळगाव. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com