चेक बुक चोरून...उद्योजकाच्या सत्तर लाखांवर डल्ला...ऑनलाईन रॅकेट सक्रिय ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जळगाव : मुंबई येथून विदेशात कपडे निर्यात करणाऱ्या कंपनीच्या उद्योजकाचे चेक बुक चोरुन त्यातील प्रत्येकी 35 लाख प्रमाणे दोन चेक असे 70 लाख रुपये वटविण्याचा प्रयत्न मुंबईच्या पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी मुंबईचे आझादनगर मैदान पोलीस ठाण्याचे पथक जळगावात धडकले. पथकाने महेंद्र गणपत पाटील (वय 35 रा. भुसावळ) यासह तिघांना अटक केली आहे. रात्री उशिरा पर्यंत पथक शहर पोलीस ठाण्यात कारवाईत व्यस्त होते. 

मुंबई परिसरात नागपाडा येथे जावेद ईस्माईल खत्री (वय-88) यांचे मुंबईतच एल.टी.मार्ग परिसरात अशोका शॉपिंग सेंटर म्हणून फर्म आहे. मुंबई, कलकत्ता, इंदोर याठिकाणांहून माल मागविला जातो. नंतर ओमान, दुबई व एमन या देशांमध्ये निर्यात केली जातो. अशोकाचे व्यवहारासाठी इंडस्‌ बॅंक हे खाते असून या खात्यावर व्यवहार होत असतात. मंगळवार (ता.17 रोजी) खत्री यांना त्याच्या बॅंक खात्यावरुन प्रत्येकी 35 लाख रुपये दोन वेळा असे एकूण 70 लाख पूर्वेश एंटरप्रायजेसच्या खात्यावर जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. असा कुठलाही व्यवहार केला नसल्याने खत्री यांना शंका आली. तत्काळ त्यांनी बॅंक गाठली. याठिकाणी व्यवस्थापकाला भेटल्यावर घडला प्रकार सांगितला. कोणत्या बॅंकेत जमा झाले हे तपासले असता, जळगाव शहरातील महावीर सहकारी बॅकेतील खात्यावर ते जमा झाल्याचे समोर आले. 

चेकबुक चोरुन रोकडवर डल्ला 
खत्री यांच्या कार्यालयातून चोरट्यांनी चेकबुक चोरुन प्रत्येकी 35 लाख रुपये (451666 व 451669 या क्रमांकाच्या) किंमतीचे दोन चेकवर हुबेहुब बनावट स्वाक्षरी करुन बॅकेत जमा केले. नंतर पूर्वेश एंटरप्रायजेसच्या जळगाव शहरातील महावीर सहकारी बॅकेच्या खात्यावर 70 लाख रुपये वळते केल्याचे आढळून आले. तत्काळ तेथील बॅंकेच्या व्यवस्थापकाने महावीर सहकारी बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाला फोनवरुन संपर्क साधला. ज्या खात्यावर 70 लाख रुपये वळते झाले, ते खाते (सिझ) गोठविण्याच्या सुचना केल्या. नंतर मुंबईत आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon stealing a check book entrepreneur's seventy million dollars