रावेर, अमळनेर, जामनेर  परिसरात वादळी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

जळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू कापणीला आलेला होता. पावसामुळे गव्हाचे नुकसान होणार आहे. 

जळगाव : जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू कापणीला आलेला होता. पावसामुळे गव्हाचे नुकसान होणार आहे. 

आज सकाळी थंड वारे वाहत होते. दुपारी उन्हाची तीव्रताही वाढायला हवी. दुपारी तीनच्या सुमारास वाकडी (ता. जामनेर) येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमळनेर, भुसावळ, रावेर, चोपडा येथेही गारपीट झाली. यामुळे केळीसह गव्हाला मोठा फटका बसला आहे. 
जळगाव शहरातही रात्री आठच्या सुमारास जोरदार वारा सुरू झाल्याने धूळ मोठ्या प्रमाणात उडत होती. वाहनधारकांसह पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले होते. नंतर परिसरात गारवा निर्माण झाला होता. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Stormy rain in Raver, Amalner and Jamner areas