जिल्हावासीयांना दिलासा..."त्या' तिघांचा मृत्यू "कोरोना'मुळे नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क केला असता नमुने तपासणीअंती त्या संशयित रुग्णाला "निमोनिया' असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आतापर्यंत "कोरोना'च्या 7 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील सर्व मृत संशयितांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहे. 

जळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या "कोरोना' संशयित 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 7) रात्रीच्या सुमारास घडली. या मृत रुग्णाचा वैद्यकीय अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून, या व्यक्तीसह यापूर्वी मृत असलेली 63 वर्षीय महिला आणि तीन वर्षीय बालिका यांचा देखील अहवाल "निगेटिव्ह' आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू "कोरोना'मुळे नाही तर इतर अन्य आजारामुळे झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात "कोरोना' संशयितांची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान, शहरातील एका 45 वर्षीय व्यक्तीला "कोरोना'सदृश लक्षणे जाणवत असल्याने त्याला उपचारासाठी सोमवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णावर उपचार सुरू असताना मंगळवारी रात्रीच्या सुमरास त्याचा मृत्यू झाला. या संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, अहवाल प्रलंबित असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क केला असता नमुने तपासणीअंती त्या संशयित रुग्णाला "निमोनिया' असल्याचे समोर आले आहे. 
दरम्यान, आतापर्यंत "कोरोना'च्या 7 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील सर्व मृत संशयितांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहे. 

एका मृत महिलेच्या अहवालाची प्रतीक्षा 

प्रकृती गंभीर असताना शहरातील 45 वर्षीय व्यक्तीला गंभीर अवस्थेतच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीवर उपचार सुरू असतानाच त्याचा काल (ता. 7) मृत्यू झाला. दरम्यान, आज या मृताचा "कोरोना' चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, तो "निगेटिव्ह' आला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी एक तीन वर्षीय बालिका व 63 वर्षीय वयोवृद्ध महिला संशयिताचा देखील मृत्यू झाला होता. या दोन्हींचा अहवाल देखील प्राप्त झाला असून, त्यांचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. त्याचप्रमाणे एका 60 वर्षीय मृत महिलेचा अहवाल प्रलंबित असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Those three deaths are not due to Corona."

टॅग्स
टॉपिकस