कामगारांचे पगार करण्यासाठी "लॉकडाउन'मधून तीन दिवस सूट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

खासगी क्षेत्रातील मजूर, कर्मचारी, अधिकारी वेतनाविना राहू नयेत, याची काळजी घेतली जावी. या आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल. 

जळगाव ः जिल्ह्यासह देशभरात 22 मार्चपासून "लॉकडाउन' करण्यात आले आहे. त्यात सर्व खासगी कंपन्या, कार्यालये बंद आहेत. यात काम करणारे कामगार, मजूर, कर्मचारी यांचे पगार करण्यास संबंधित मालक, मॅनेजर यांना 7 ते 9 एप्रिल 2020 दरम्यान "लॉकडाउन'मधून सूट देण्यात आली आहे, असे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले. 

"लॉकडाउन'मुळे कर्मचारी, मजूर, अधिकारी यांना पगार देण्यात आलेले नाहीत. पगार देण्यासाठी नेमलेले मालक, मॅनेजर, मालक यांना वेळ मिळावा, यासाठी 7 ते 9 एप्रिल 2020 दरम्यान "लॉकडाउन'मधून कामाच्या ठिकाणी येण्यास सूट दिली आहे. या काळात ते संबंधित कर्मचारी, मजूर आदींचे पगार तयार करून देऊ शकतील. 1 ते 100 कर्मचाऱ्यांसाठी- 1, 100 ते 200 साठी- 2, 200 ते 500 साठी- 3 व 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसाठी 4 जणांना "लॉकडाउन'मधून सूट दिली आहे. यात स्वतः मालकही येऊ शकतात. मात्र, खासगी क्षेत्रातील मजूर, कर्मचारी, अधिकारी वेतनाविना राहू नयेत, याची काळजी घेतली जावी. या आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Three days exemption from "lockdown" to pay workers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: