ऐन सुट्यांमध्ये नऊ रेल्वे गाड्या रद्द 

ऐन सुट्यांमध्ये नऊ रेल्वे गाड्या रद्द 

भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे (ता. १९) गाडी क्रमांक (११०२६) पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेल, कल्याण ऐवजी दौंड, मनमाड वरून येणार आहे. तसेच उशिरा सुटनाऱ्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक (११०६१) एलटीटी मुझफ्परपुर एक्सप्रेस १२.१५ ऐवजी १.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक (१२८६९) मुंबई-हावडा एक्सप्रेस ११.०५ ऐवजी ३ वाजता सुटेल. गाडी क्रमांक (११०५५) एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस १०.५ ५ ऐवजी १४.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक (१२५४२)एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस ११.१० ऐवजी ३ वाजता सुटेल. गाडी क्रमांक (०२०२१) मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस ११.३० ऐवजी ३.३५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक (११०७१) एलटीटी-वाराणसी एक्सप्रेस १२.४० ऐवजी २:१० वाजता सुटणार आहे. गाडी क्रमांक (१२१८८) मुंबई-जबलपूर एक्सप्रेस १.३० ऐवजी १:४५ वाजता सुटणार आहे. गाडी क्रमांक (०४११६) मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस ४.४० ऐवजी दुसऱ्या दिवशी (ता.२०) १२:२० वाजता सुटेल. 
गाडी क्रमांक (१२०७२) जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस जालना येथून सकाळी ४.४५ ऐवजी ७.४५ वाजता सुटणार आहे. 
 
अर्ध्यावर धावणाऱ्या गाड्या 
गाडी क्रमांक (१२१४०) नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर येथून (ता.१८) रोजी सुटणारी गाडी नागपूर ते नाशिक पर्यंतच जाणार आहे. गाडी क्रमांक (१२१३९) मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (ता.१९) ला मुंबई ऐवजी नाशिक ते नागपूर चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक (११०९४) वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस वाराणसी येथून (ता.१८) ला सुटणारी गाडी वाराणसी ते दादर चालविण्यात येणार आहे. 

रद्द झालेल्या गाड्या 
गाडी क्रमांक (५११५४) भुसावळ-मुंबई पॅसेंजर (ता. १८) रद्द करण्यात आली आहे. तर (ता.१९) धावणाऱ्या(५११५३) मुंबई-भुसावळ पॅसेंजर, १२११८ मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस, १२११७ एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस, २२१०२ मनमाड-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस, २२१०१ मुंबई-मनमाड राज्यरानी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com