व्हॅलेंटाईनची चॉकलेट घेवून गेली तुरूंगात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

व्हॅलेंटाईन फिवरमधुन या मजनुने आणलेली चॉकलेट नाकारल्यानंतर वाद झाला. या मजनुवर परिसरातील तरुणांनी पब्लीक मार देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

जळगाव ः व्हॅलेंटाईन डे म्हटला म्हणजे महाविद्यालयीन तरूणांचा उत्साह असतो. सध्या व्हॅलेंटाईनचा सप्ताह सुरू असून, आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला त्या विशिष्ट दिवसाची भेट देवून तरूण वर्ग दिवस साजरा करतो. पण एकतर्फी प्रेम करणे यासाठी अडचण ठरत असते. प्रेमाच्या आठवड्यातील "चॉकलेट डे'चे निमित्त साधत प्रेमवीराने तरूणीस चॉकलेट देवू केले. पण हे चॉकलेट त्या तरूणाला थेट तुरूंगातच घेवून घेण्याचा प्रकार शहरात घडला. 

शहरातील हरिओमनगरातील तरुण गेल्या दिड- दोन वर्षापासुन एका मुलीच्या मागावर आहे. गेल्या दिड दोन वर्षापासुन एकतर्फी प्रेमातून छळ सहन करणाऱ्या मुलीचा हात धरुन चक्क दम दिल्याचा प्रकार रविवारी घडला. पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात धडकत तक्रार दिल्यावर अमोल सुकलाल ठाकूर (ंवय-27, रा.हरीओमनगर) याच्या विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॅलेंटाईन फिवरमधुन या मजनुने आणलेली चॉकलेट नाकारल्यानंतर वाद झाला. या मजनुवर परिसरातील तरुणांनी पब्लीक मार देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

दोन वर्षांपासून पाठलाग 
जळगाव शहरातील सामान्य कुटूंबातील बावीस वर्षीय तरुणी शिक्षणासह फुलेमार्केटमध्ये पार्टटाईम काम करुन उदनिर्वाह चालवते. तिची ईच्छा नसतांना अमोल ठाकूर हा एकतर्फी प्रेमातुन तिच्या मागावर होता. गेल्या दिड- दोन वर्षापासून पिच्छापुरवून त्रास देत होता. घडल्या प्रकाराबद्दल यापुर्वी पिडीतेने चार वेळेस पोलिसात तक्रार करुनही भामट्यावर कुठलाच फरक पडला नाही. 

चॉकलेटला नकार म्हणून केली अंगलट 
सद्या "व्हॅलेंटाईन-डे' ची जोरदार लागण झालेली असून त्याच प्रभावात असलेल्या अमोल ठाकुरने अनेकवेळा नकार देणाऱ्या तरुणीला गाठून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करुन चॉकलेट घेण्यासाठी हट्ट करू लागला. त्या तरूणीने नकार दिल्याने मात्र, अमोल ठाकूर याने थेट हात धरुन तिच्याशी अंगलट करीत धमकावल्याची घटना घडली. पिडीतेने पालकांसह शहर पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिल्यावरुन अमोल ठाकुर याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी संशयीताला अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले असून अमोल ठाकुर याला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon valentine day choclate day boy girl police complate