ईश्‍वर चिठ्ठीने "व्हीव्हीपॅट'च्या मशिनची मतमोजणीसाठी निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने जोमात सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे दररोज मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेत आहेत. ईव्हीएम'द्वारे झालेल्या मतांची मोजणी झाल्यानंतर "व्हीव्हीपॅट' मधील चिठ्ठ्यांच्या मोजणीचे आदेश आहेत. कोणत्या विधानसभा मतदार संघातून कोणत्या केंद्राचे व्हीव्हीपॅट मशिनच्या चिठ्ठ्या मोजायच्या याबाबत 'ईश्‍वर चिठ्ठी टाकून' मशिनची निवड केली जाणार आहे. 

यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मशिन मतदारांना आपण कोणाला मतदान केले आहे ते पाहण्यासाठी मतदानावेळी ठेवण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर मतदाराला आपण केलेल्या मतदानाची चिठ्‌ठी 7 सेकंद स्क्रीनवर दिसून ती तेथेच खाली पडणार होती. यामुळे मतदारांना आपण केलेले मतदान व झालेले मतदान बरोबर आहे याची खात्री झाली. मात्र तरीही शंका राहू नये म्हणून निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रातील पाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याची तपासणी करायची. त्यामशिन मधील मते व ईव्हीएम मधील मते पडताळून पाहायची अशा सूचना आहेत. यामुळे सर्व मतमोजणी झाल्यानंतर विधानसभा निहाय चिठ्ठ्या टाकून मतदान केंद्राची निवड होईल. त्यातील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातील. 
लोकसभा निवडणुकीसाठी अगोदर दोन निरीक्षक होते. त्याची संख्या आता चार करण्यात आली आहे. या चारही निवडणूक निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली मतमोजणी होईल. 

सैनिकी मतांचे पाच बारकोड तपासणार 
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील मतदार सैनिकांना ई-यंत्रणे द्वारे मतदानपत्रिका पाठविल्या होत्या. त्यांना विशिष्ट प्रकारचे पाच ठिकाणी बारकोड देण्यात आले होते. जेव्हा सैनिकांच्या मतांची मोजणी होईल त्यावेळी ई-यंत्रणेद्वारे आलेल्या मतपत्रिकांची सात वेळा स्कॅनिंग होईल. त्यातील विविध ठिकाणी असलेल्या पाच बारकोडची तपासणी होईल. मतदान यंत्रणेने पाठविलेले बारकोडची मतपत्रिका व आलेली मतपत्रिका बरोबर आहे किंवा नाही याची खात्रीकरूनच मतमोजणी होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vvpat machin vot counting