शहरात अस्वच्छता करणाऱ्या "वॉटरग्रेस'चा मक्ता रद्द करा : माजी मंत्री महाजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

महापालिका निवडणुकीत जळगावकरांना मी वर्षभराचा शब्द दिला होता. परंतु आता दीड वर्ष होण्यात आले, आहे तरीही ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्या नागरिकांना मिळत नाहीत.

जळगाव : नागरिकांच्या हितासाठी आपण एकमुस्त सफाईचा मक्ता "वॉटरग्रेस' या कंपनीला दिला. परंतु या कंपनीने काम व्यवस्थित केले नसल्याने त्याचा मक्ता कायदेशीर बाबी संभाळून विरुद्ध करून टाका, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी भाजप नगरसेवकांच्या आज झालेल्या बैठकीत दिल्या. 

भाजप नगरसेवकांची बैठक सायंकाळी बालाजी लॉन्समध्ये झाली, त्यात ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्यासह महापालिकेतील सर्व भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. आमदार महाजन म्हणाले, की महापालिका निवडणुकीत जळगावकरांना मी वर्षभराचा शब्द दिला होता. परंतु आता दीड वर्ष होण्यात आले, आहे तरीही ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्या नागरिकांना मिळत नाहीत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या प्रभागात जातीने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडव्यात. 

सफाईचा मक्ता रद्द करा 
जळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण "वॉटरग्रेस' या कंपनीला मक्ता दिला. परंतु त्यांनी जळगाव शहराची वाट लावली. कोणालाही पाठीशी घालू नका. कायदेशीरपणे त्यांचा मक्ता रद्द करून टाका, अशा स्पष्ट सूचना महापालिका पदाधिकाऱ्यांना आमदार महाजन यांनी बैठकीत दिल्या. 

"कोरोना'बाबत घरोघरी जाऊन जनजागृती करा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (22 मार्च) "जनता कर्फ्यू' चिन्हात दिलेली आहे. याबाबत प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या प्रभागात जाऊन मते मागण्यासाठी ज्या पद्धतीने आपण जातात त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून "कोरोना'संदर्भात जनजागृती करा. त्यांना "मास्क' वाटा, अशा सूचनाही श्री. महाजन यांनी नगरसेवकांना दिल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon water gress contract cancal bjp member girish mahajan