जामनेरची पाणीटंचाई बेतली तरुणीच्या जिवावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव : जामनेर तालुक्‍यात भीषण पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील जांभूळगावातील सोळा वर्षीय तरुणी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असताना खोल विहिरीत तोल जाऊन खाली पडली. पूनम विजय कोळी (वय 16) असे, जखमी तरुणीचे नाव असून, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई असताना जामनेरमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ असूनही टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर जामनेर तालुक्‍यात सुरू आहेत. ही टंचाई नागरिकांच्या जिवावर बेतत असून, त्याचाच अनुभव आज आला. 

ग्रामस्थांची मदतीसाठी धाव 
जांभूळगाव (ता. जामनेर) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. गावातील पूनम कोळी ही विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. अगोदरच तळ गाठलेल्या विहिरीत भांडे सोडल्यावर डोकावून पाहताना तिचा तोल जाऊन पूनम खाली पडली. ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत तिला विहिरीतून जखमी अवस्थेत बाहेर काढले. शासकीय रुग्णवाहिकेद्वारे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आई जिजाबाईचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. जखमी तरुणीवर तातडीचे उपचार करण्यात आले असून, तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon water tanchai girl