न सांगता ती पुन्हा आली... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

जळगाव : थंडी गेली असे वाटत असताना ती पुन्हा परतली आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली असून जिल्ह्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. आज तापमान सरासरी 13 अंशावर आले होते. मागील आठवड्याभरापासून तापमान 12- 13 अंश सेल्सिअसवर फिरत आहे. 

जळगाव : थंडी गेली असे वाटत असताना ती पुन्हा परतली आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली असून जिल्ह्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. आज तापमान सरासरी 13 अंशावर आले होते. मागील आठवड्याभरापासून तापमान 12- 13 अंश सेल्सिअसवर फिरत आहे. 
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शिवाय बेमोसमी पाऊस देखील नोव्हेंबरपर्यंत सुरूच होता. त्यामुळे यावर्षी कडाक्‍याची थंडी पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तशीच स्थिती निर्माण झाली आहे. मुळात हिवाळा सुरू होवून दीड- दोन महिने झाल्यानंतर देखील कडाक्‍याची थंडी न पडता उकाडा जाणवत होता. मात्र आता फेब्रुवारी उजाळल्यानंतर देखील थंडी संपत नसल्याचा अनुभव येत आहे. 

थंडीचा जोर कायम 
मकरसंक्रांतीपासून थंडी कमी होत असल्याचे जुने जाणकारांकडून सांगण्यात येते. यंदा मात्र उलट परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. मकरसंक्रांतीपासून थंडीने जोर धरला आहे. दिवसा ऊन व सकाळी, रात्री कडाक्‍याची थंडी जाणवू लागली आहे. तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होवून थंडी गायब झाल्याचा अनुभव येतो. तर कधी दिवसा ऊन असले तरी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहण्यास मिळत आहे. मात्र साधारण आठवडाभरापासून पारा 12 ते 14 अंश सेल्सिअसभोवतीच फिरत आहे. 

उन्हाळा लांबण्याची शक्‍यता 
अवकाळी पावसामुळे थंडी उशिराने पडण्यास सुरवात झाली. यामुळे थंडीचे दिवस देखील लांबले आहे. शिवाय दरवर्षी मकरसंक्रांतीनंतर वातावरणात बदल होवून थंडीचा जोर कमी होण्यास सुरवात होते. यंदाचे चित्र वेगळे असून उन्हाळा लांबण्याची शक्‍यता आता वर्तविण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon winter season februvary month