Women's Day : रात्रीचा दिन करत मुलांसाठी त्यांची "छाया'

राजेश सोनवणे
रविवार, 8 मार्च 2020

जळगाव : शेतकरी कुटुंब असल्याने घरातील परिस्थिती बेताचीच. सुखी संसाराचा गाडा ओढताना संसारवेलीवर बहरलेल्या दोन फुलांनी शाळाच नाही, तर अंगणवाडीची पायरीही चढली नाही. अशातच पतीचे निधन झाले. त्यामुळे दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. मात्र, तरीही न खचता खंबीरपणे उभे राहून रात्रीचा दिवस करत रुग्णालयात सेविका म्हणून काम अन्‌ सकाळी घरी येताच अंगणवाडीत कामाला जायचे. अशात मुलांना वेळ देऊन उच्चशिक्षित केले, नव्हे तर एकाला उपजिल्हाधिकारी आणि दुसऱ्याला डॉक्‍टर बनविले. 

क्‍लिक करा - आईच्या रक्तासाठी मुलाची धावपळ... अन्‌ कर्मचारी अडले कागदपत्रांसाठी

छाया वासुदेव भोळे या मूळच्या हिंगोणा (ता. यावल) येथील रहिवासी. परंतु नोकरीसाठी जळगावात स्थायीक होऊन मुलांना नोकरीला लावल्यानंतर आता अकोला येथे लहान मुलाकडे वास्तव्यास आहेत. मुलांचे भविष्य घडविणारा त्यांचा हा प्रवास. या प्रवासात त्यांना आई-वडील, भाऊ आणि बहिणीने साथ देत कुंदन आणि चंदन यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण करून केले. पण दोन्ही मुलांवर चांगले संस्कार आणि शिक्षणाची वाट दाखवून उच्चपदापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. 

हॉस्पिटलमध्ये नाइट शिप्ट 
छाया भोळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असल्याने शिक्षणाचे महत्त्व बऱ्यापैकी माहीत होते. परंतु पती वासुदेव भोळे शेती करत असल्याने त्याही शेतात राबायच्या. दरम्यान, मोठा मुलगा कुंदन तीन वर्षांचा आणि लहान मुलगा चंदन दीड वर्षाचा असताना 1987 मध्ये पतीचे निधन झाले. दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग करत त्यांनी मॉन्टेसरी कोर्स केला. याचदरम्यान त्यांनी गाव सोडत जळगावात आल्या. येथे येऊन डॉ. रंजना बोरसे यांच्याकडे रात्री आठ ते सकाळी आठ असे नाइट शिप्टमध्ये काम करण्यास सुरवात केली. शिवाय बेंडाळे महाविद्यालयाच्या अंगणवाडीत सकाळी आठ ते दुपारी बारा असे काम सुरू केले. 

उपजिल्हाधिकारी, डॉक्‍टर बनविले 
शिक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने मुलांना सुरवातीपासूनच चांगल्या शाळेत घालून त्यांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले. मोठा मुलगा कुंदनचा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमाला नंबर लागला. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कळवा (जि. ठाणे) येथे एका खासगी कंपनीत कामाला सुरवात केली. एमपीएससी परीक्षा देऊन ते आज सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. तर लहान मुलगा चंदनने एमबीबीएस व ऑर्थोपेडिकचे शिक्षण पूर्ण केले. ते आज अकोला येथे ऑर्थोपेडिक म्हणून प्रॅक्‍टिस करत आहेत. या साऱ्या प्रवासात रात्रंदिन काम करताना मुलांच्या शिक्षणाकडे छायाबाईंचे लक्ष कायम राहिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon womens day story chaya bhole docter and depty collector