"लॉकडाउन'मध्ये छंदातून पुण्याच्या तरुणाकडून जागृती; "कोरोना'संदर्भात पेंटिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

पुण्याला घरी परतलेला असून "लॉकडाउन'च्या काळात तो घरातूनच आपली कला जोपासत फळांवर विविध चित्रकृती तयार करून तसेच विविध "कोरोना'संदर्भातील पेंटिंग तयार करून जनजागृती करत आहे.

जळगाव : संपूर्ण देशात "कोरोना'ने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या संकटाशी तोंड देत आहे. अशातच परदेशात नोकरी करणारे तरुण आपल्या मायदेशी परतले आहेत. असाच सिंगापूरमध्ये एका केक कंपनीत शेफ असलेला तरुण पुण्याला घरी परतलेला असून "लॉकडाउन'च्या काळात तो घरातूनच आपली कला जोपासत फळांवर विविध चित्रकृती तयार करून तसेच विविध "कोरोना'संदर्भातील पेंटिंग तयार करून जनजागृती करत आहे.

 
"कोरोना'चा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून, त्यात मुंबई, पुणे या शहरांत तर कहर माजला आहे. संपूर्ण शहरात संचारबंदी लावलेली असून, अनेक परिसर सील केले आहेत. त्यात 31 वर्षीय पुण्यातील तरुण नितीन संजय पाटील हाही "कोरोना'मुळे सिंगापूर येथील नोकरी सोडून मार्चमध्येच घरी परतला. "लॉकडाउन'मुळे घरातच बसून बोर होऊन आपल्या अंगी असलेली कला जोपासत त्याने कलिंगडावर "कोरोना'चे विविध संदेश देणारी चित्रे कोरली आहेत. तसेच चित्रकलेची आवड असून "कोरोना'मुळे संपूर्ण जगावर तसेच अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाचे चित्रही त्याने रेखाटले आहे. 

कलिंगडावर रेखाटला भारत 
नितीन हा "शेफ' असून तो सिंगापूरला नामांकित "प्रेमा डेली' या केक कंपनीत गेल्या तीन-चार वर्षांपासून नोकरीस होता. "कोरोना'मुळे नोकरी सोडून भारतात आल्यावर त्याने आता घरूनच अंगी असलेली कला जोपासत असून कलेद्वारे "कोरोना'शी लढणारे भारतातील चित्र कलिंगडावर रेखाटले असून, भारताला मॉस्क लावलेले आहे. तर दुसऱ्या कलिंगडावरील आकारलेली चित्रकृतीमध्ये "स्टे होम बी सेफ' इंग्रजीमधून सुंदर कलेद्वारे संदेश देणारी कलाकृती तयार केली आहे. 

"कोरोना'चे संकट पेटींगमधून साकारले 
संपूर्ण जगाला "कोरोना'ने विळखा घातला आहे. त्यामुळे अनेक आर्थिक बलाढ्य देशांचीही स्थिती कोलमडली आहे. तसेच चीनमधून आलेला हा "कोरोना' कशाप्रकारे संपूर्ण जगात पसरून जगातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, चीन मात्र स्टेबल आहे, असे बोलके पहिले चित्र रेखाटले आहे. तर दुसऱ्या चित्रात कोरोना ड्रायगन राक्षसापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी लढणारे डॉक्‍टर व पोलिस असे वास्तव दर्शविणारी चित्रकृती नितीनने आपल्या पेंटींगद्वारे साकारली आहे. 

सिंगापूरची अर्थव्यवस्था कोलमडली 
नितीन सिंगापूरच्या परिस्थितीवर म्हणाला, की सिंगापूरची 50 टक्के अर्थव्यवस्था तेथील  पर्यटन व्यवस्थेवर आहे. "कोरोना'मुळेही सिंगापूरला लॉकडाउन असल्याने संपूर्ण पर्यटन व्यवसाय संपूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे विविध कंपन्यांतील भारतीयांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. यात छोट्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. 

पुण्यातच आता करिअर : नितीन 
बॅचलर टाइम हा बाहेरच काढल्याने आता पुण्यातच पुढील करिअर करायचे आहे. आता कुटुंबीयांसोबत राहून त्यांना वेळ देऊनच पुढील करिअर पुण्यात करणार आहे. स्वतःचे हेल्दी प्रॉडक्‍ट आणण्याचा मानस असल्याचे नितीनने "सकाळ'ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young boy corona avarness create fruit dessine pune city