जळगावमध्ये रविवारी "झीरो शॅडो डे' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः "शून्य सावली दिवस (झीरो शॅडो डे) हा वर्षातून दोन वेळा येत असतो. या "झीरो शॅडो डे'चा जळगावात रविवारी (26 मे) अद्‌भुत नजारा व भौगोलिक घटना अनुभवास मिळणार आहेत. नागरिकांना हा अनुभव काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात अनुभवण्यासाठी जळगावकर खगोलप्रेमींतर्फे सौर घड्याळाच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दररोज नेहमीप्रमाणे बारा वाजता सूर्य डोक्‍यावर येतो अन्‌ त्याची सावली आपल्याला दिसते. परंतु वर्षातून दोन वेळा "झीरो शॅडो डे' येत असून रविवारी (26 मे) हा अनुभव खगोलप्रेमी व नागरिकांना अनुभवता येणार आहे. यामध्ये आपली सावली आपल्या पायाखाली दिसणार आहे. यासाठी जळगावकर खगोलप्रेमींनी भाऊंच्या उद्यानात "सौर घड्याळ'चे प्रात्यक्षिक या दिवशी दुपारी बाराला आयोजित केले आहे. 

दुपारी बारानंतर दाखविणार प्रात्यक्षिक 
स्थानिक वेळेनुसार 12 वाजून 12 मिनिटांनी, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी "झीरो शॅडो डे' कसा असतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. हा एक वेगळा अनुभव खगोलप्रेमी व 
नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जळगाव खगोल ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon zero sado day sonday