दागिने पॉलिश करणारे येताय सांभाळा... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

रावेर ः घरात एकट्या राहणाऱ्या महिलांना पाहून त्यांना फसविण्याचे काम अनेकदा घडतात. महिलांना फसविणे सोपे समजत याचा अनेकजण फायदा घेत असतात. अशीच घटना आज विवरे खु. (ता. रावेर) येथे आज घडली. दागिन्यांना सोन्याची पॉलिश करून देते असे सांगत एक महिला दागिने घेवून फरार झाल्याचा प्रकार घडला. 

विवरे खुर्द (ता. रावेर) गावातील लोखंडे वाड्यात राहणाऱ्या घरासमोर एक महिला आली. घरात असलेल्या महिलेला हाक मारत दागिन्यांना पॉलिश करून चमकविते असे सांगितले. ही घटना सकाळी लोखंडे वाड्यात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार एक 27 ते 28 वर्षीय अज्ञात महिला (नाव गाव माहीत नाही) आली. तिने एका महीलेला दागिन्यांचे होलमार्क द्या; त्या बदल्यात दिड हजार रुपयेप्रमाणे पैसे भेटतील असे बोलुन भुलथापा देऊन फसवणुक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

99 हजाराची रक्‍कम घेवून फरार 
जुन्या किंमतीचे सहा ग्रॅम सोने 99 हजार 200 रुपये किंमतीचे दागिने त्यात सहा ग्रम सोन्याचे कानातील टॉप सेट, तीन ग्रॅम मंगल सुत्राची वाटी 2 नग, दोन ग्रॅम मणी एक ग्रॅम, चांदीचे जोडवे सहा भार असे दागिने घेउन जावून परत केले नाही. यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने सुमनबाई बाळू महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून निंभोरा पोलीस स्टेशनला गुरन/भादवी कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय. योगेश शिंदे. पो.कॉं. सुनिल वंजारी हे करीत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalraon gold jwellary pollysh froad woman