esakal | पंधरा दिवसात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू; आणि गावकऱ्यांची अनोखी श्रध्दांजली
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरा दिवसात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू; आणि गावकऱ्यांची अनोखी श्रध्दांजली

पंधरा दिवसात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू; आणि गावकऱ्यांची अनोखी श्रध्दांजली

sakal_logo
By
योगीराज ईशी

कळंबू : गेल्या पंधरा दिवसांत शहादा तालुक्यातील कळंबू येथे वृद्ध, तरुण व मध्यम वयोगटातील अशा चार ते पाच जणांचा विविध कारणांमुळे व विविध ठिकाणी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत चार जणांचा वृद्धपकाळाने तर दोन तरुणांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याने गावात गुढी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी गुढी न उभारता मृतांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत अनोखी श्रद्धांजली वाहिली. सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडवला असून दुसऱ्या लाटेत बहुतेकांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांच्या जाण्याने परिवारात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अशा घडल्या घटना

राजेश रोहिदास बोरसे (वय २८) या तरुणांचे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ८ मे २०२० रोजी कोविडच्या नियमांचे पालन करीत विविह झाला होता. तो नोकरीनिमित्त गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. परंतु त्याला काही दिवसांपूर्वीच बरे नसल्याने बडोदा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १० एप्रिल रोजी निधन झाले. यामुळे पत्नीसह आई, वडील, भाऊ पोरके झाले. तर राजेंद्र धनाजी देवरे (वय ५४, रा. कळंबू, ह. मु. लोणखेडा, ता. शहादा) हे धुळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी (ता.१२) निधन झाले. ते लोणखेडा येथील लोकनायक सूतगिरणीत इलेक्ट्रिक इंजिनियर पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. तर येथील व्यावसायिक भगवान राजाराम महाले यांचे अल्प आजाराने निधन झाले.