स्मशानभूमीचे रुपडे पालटून खडतर 2020 या वर्षाला या गावाने दिला निरोप

जगन्नाथ पाटील
Thursday, 31 December 2020

स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची दूरावस्था झाली होती. या रस्त्यालाही पंचायतीने चकाचक केले आहे.

कापडणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यापासून जनजिवन विस्कळीत झाले आहे. 2020 हे वर्ष अनेक धक्कादायक आठवणींनी स्मरणात राहणार आहे. या वर्षाला निरोप देण्यासाठी येथील तरुणांनी थेट स्मशानात जावून स्वच्छता अभियान राबविले.

आवश्य वाचा- थर्टी फस्ट साजरी करताय ! साडेदहा पर्यंतचं हाॅटेल, बार सुरू राहणार 

दोन तासात स्मशानभूमी चकाचक केली. तर रांगोळ्या काढून स्मशानभूमीला विशेष स्वरुप प्राप्त करुन दिले. तरुणांच्या या विधायक उपक्रमाचे भरभरुन कौतुक होत आहे.

कापडणे विधायक गृृृृृृप
कापडणे विधायक गृृृृप दरवर्षी विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबावित असतो. 2020 या कोरोनाबाधित वर्षाला निरोप देण्यासाठी स्वच्छता अभियान राबाविले. संपूर्ण स्मशान भूमी चकाचक केली. यासाठी गृृृृपचे जगन्नाथ पाटील, आदर्श शिक्षक मनोज पाटील, चेतन पाटील, महेश मंदाणेकर, बंटी पाटील, दत्तात्रेय पाटील, अभियंता प्रशांत पाटील, वैभव पाटील, जयेश पाटील, गोलू पाटील, विनोद पाटील, जितेंद्र पाटील आदी युवक सहभागी झाले.

वसुंधरा अभियान
येथील ग्रामपंचायत वसुंधरा अभियान अंतर्गत प्लॅस्टीकमुक्त अभियान व स्वच्छता अभियान राबावित आहे. स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याची दूरावस्था झाली होती. या रस्त्यालाही पंचायतीने चकाचक केले आहे.

आवर्जून वाचा- सरत्या वर्षात केवळ एकनाथ खडसे विरुध्द भाजप; आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुराळा !

स्मशानभूमी रांगोळ्यांनी रेखाटले

रांगोळ्या रेखाटत नव्वद वर्षीय आजीच्या अंतयात्रेचे सन्मान नव्वदवर्षीय द्वारकाबाई हिंमत पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेचे स्मशानभूमीत रांगोळ्या रेखाटत स्वागत झाले. संपूर्ण दोन एकर स्मशानभूमीत रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजनही विधायक गृपने केले होते.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne dhule farewell year village cleaning young cemetery