धुळेः लाल्या रोगाचा प्रादुर्भाव..कापसाच्या शेतात सोडल्या मेंढ्या

शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. धुळे तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्यात.
Cotton Crop
Cotton Crop


कापडणे: पावसाळ्याचे महत्त्वपूर्ण तीन महिने चारच पावसांत निघून गेले. शेवटच्या महिन्यात अतीवृष्टी (Heavy Rain) आणि सातत्यपूर्ण पावसाने खरीप हंगामाचे (Kharip Hangam) मोठे नुकसान झाले. पावसाळा संपता संपता कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाची शेती सोडून देण्याची वेळ आली आहे. बहुतांश शेतकऱ्‍यांनी (Farmer) लाल्या आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या (Cotton) शेतीत गुरे सोडली आहे. रोटाव्हेटर फिरवून रब्बीची तयारी सुरू केली आहे.

Cotton Crop
कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार

पावसाअभावी कडधान्याचा हंगाम आलाच नाही. शेतकऱ्‍यांच्या कपासावर उरलेल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. कापसावर मर, बोंड अळी, करपा आणि लाल्याचा प्रादुर्भाव आदी रोगांचा हल्ला एकाच वेळी पाहायला मिळत आहे. शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. धुळे तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्यात. त्यातही बहुतांश शेतकऱ्‍यांनी दुबार पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात मूग, उडीद, चवळी या कडधान्याचा बऱ्‍यापैकी पेरा होता. दुबार पेरणी अन त्यानंतर महिनाभर लांबलेल्या पावसाने कडधान्य पिकांची वाढच झाली नाही. हा हंगाम पूर्णपणे हातचा गेला. घरापुरतेही कडधान्य हाती लागलेले नाही. नगदी पिक आणि सुगीपूर्व बऱ्‍यापैकी हाती लागल्यास हाती पैसा येतो. मात्र हा हंगाम गेल्याने शेतकऱ्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे.


कापसाचे व्हावेत पंचनामे
शेतकऱ्‍यांची कापूस आणि मक्यावर आशा आहे. दोन्ही पिकांची पावसाअभावी पुरेशी वाढ झालेली नाही. कापसावर मर, करपा, बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. बऱ्‍याचशा शेतांमध्ये कापसाची स्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्‍यांनी मोठा खर्च करूनही हाती काहीही लागणार नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कापसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होवू लागली आहे.

Cotton Crop
धुळेः दोन कोरोनाबळींमुळे धोक्याची घंटा पुन्हा वाजली

कापसाला भाव पण..
कापसाचा भाव प्रती क्विंटल आठ हजारावर पोचला आहे. प्रथमच एवढ्या भावामुळे शेतकऱ्‍यांचे डोळे विस्फारले आहेत. पण लाल्याने कापसाचा पांढरा रंग फिका केला आहे. शेतकऱ्‍यांच्या पदरी निराशाच आहे.
- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com