साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली मंदाणे, काथर्दे दिगरची यात्रोत्सव रद्द !

दिनेश पवार 
Monday, 25 January 2021

शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होत असते. यंदा २८ जानेवारीला शुद्ध शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होणार होती.

मंदाणे : सारंगखेडा यात्रोत्सवानंतर नागरिकांना आतुरता असणाऱ्या मंदाणे व काथर्दे दिगर येथील यात्रोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरील नियम पाहता रद्द करण्यात आली आहे. त्याबाबतची बैठक नुकतीच शहादा तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

आवश्य वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील 339 शाळांची घंटा वाजणार
 

मंदाणे येथील यात्रोत्सवास सुमारे ३७० वर्षे, तर काथर्दे दिगर येथील यात्रोत्सवास सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे. ही दोन्ही यात्रा मोठी यात्रेत गणल्या जातात. दरवर्षी शुद्ध शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होत असते. यंदा २८ जानेवारीला शुद्ध शाकंभरी पौर्णिमेला यात्रेची सुरुवात होणार होती. प्रशासनाच्या आदेशान्वये दोन्ही यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र दोन्ही गावातील मंदिरात जन्मोत्सवानिमित्त शासनाच्या अधीन राहून फक्त विधिवत पूजा केली जाणार आहे. 

वाचा-  यंत्रणांच्या मनमानीमुळे नागरिकांचे हाल; प्रश्‍न तडीस नेण्यास विरोधकही असमर्थ 
 

मंदाणे यात्रेसंबंधी झालेल्या बैठकीत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. झेड. देवरे, सरपंच विजय सनेर आदी उपस्थित होते. काथर्दे येथील ग्रामसेवक एस. आर. सरदार, सरपंच गोरख भिल, उपसरपंच गुलझारसिंग गिरासे, ट्रस्टचे चेअरमन भिमसिंह गिरासे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news madane nandurbar tradition three hundred fifty years yatra canceled