esakal | Video कुत्र्यामुळे वाचले मालकाचे प्राण; नागाला तासभर खेळवत ठेवले

बोलून बातमी शोधा

dog snack

लिंबूच्या बागेत फेरफटका मारताना त्यांचा कुत्रा टॉमीही सोबत होता. लिंबूच्या बागेजवळ आल्यावर पुढे नाग फणा काढून थांबला होता, याची कल्पना सुनील महाजन यांना नव्हती. मात्र,नागाला बघून टॉमी तत्क्षणी त्याच्यापुढे धावून गेला.त्याला जागेवरून हलू देत नव्हता.नाग हाळु हाळु नाल्याकडे निघाला मात्र टाँमीने मालक सुनील यांचं रक्षण करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता.

Video कुत्र्यामुळे वाचले मालकाचे प्राण; नागाला तासभर खेळवत ठेवले
sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : एकवेळ रक्ताची नाती संकटात आपला हात सोडतात. पण मुक्या प्राण्यांना लावलेला जीव अन् त्याबदल्यात त्यांची मालकाप्रति असलेली निष्ठा ही संकटकाळी देखील कायम राहते. त्याची प्रचिती येथील शेतकऱ्याला आली. शेताच्या बांधावर नाग फणा काढून थांबला होता. मात्र, कुत्र्याच्या प्रसंगावधानाने मालकाचा जीव वाचला.नागाचा व कुत्र्याचा हा थरार जवळपास एक तास रंगला.

मुक्या प्राण्यांना जीव लावला, की ती आपली होतात. आणि मग आपल्यावर येणारे प्रत्येक संकट ते स्वतःवर घेतात.याची प्रचिती मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील जामदा रस्त्यावरील मन्साराम महाजन यांच्या शेतात आली.श्री  महाजन यांचा मोठा मुलगा सुनील हा गुरुवारी (ता. 5) रोजी दुपारी बाराच्या सुमारास शेतात आलेले होते.आल्यावर नेहमीप्रमाणे टाँमीने त्यांच्या अंगावर आपले दोन्ही पाय ठेवले व सुनील यांनी देखील प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवत लिंबुच्या बागेकडे फेर फटका मारायला गेले.त्यांच्या सोबत टाँमीने देखील मालकाच्या पुढे रस्ता धरला.सुनील महाजन हे लिंबुच्या बागेची पहाणी करण्यात मग्न झालेले होते. 

अन् टाँमीने घेतली धाव.... 
लिंबूच्या बागेत फेरफटका मारताना त्यांचा कुत्रा टॉमीही सोबत होता. लिंबूच्या बागेजवळ आल्यावर पुढे नाग फणा काढून थांबला होता, याची कल्पना सुनील महाजन यांना नव्हती. मात्र,नागाला बघून टॉमी तत्क्षणी त्याच्यापुढे धावून गेला.त्याला जागेवरून हलू देत नव्हता.नाग हाळु हाळु नाल्याकडे निघाला मात्र टाँमीने मालक सुनील यांचं रक्षण करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता.त्यासाठी टॉमीने तासभर नागाला खेळवत ठेवलं.नाग देखील टाँमीला दंश करण्याचा प्रयत्न करत होता.परंतु टाँमीने त्याला चकवा देत एकाच जागेवर थांबून ठेवले होते.

शेताबाहेर गेल्यावरच नागाची सुटका 
लिंबुच्या बागेजवळ असलेल्या नाग हा आपल्या मालकाकडे येत असल्याचे पाहुन टाँमीने नागाला नाल्याकडे उतरण्यासाठी भाग पाडले.आज जर टाँमी असल्याने मालकाचे प्राण वाचले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.अखेर सुनील शेताबाहेर गेल्यावर त्याने नागाला हलू दिलं. या मालकाप्रति असलेल्या टॉमीच्या निष्ठेबाबत त्याचे परिसरात कौतुक होत आहे.या बाबतीत असे अनेकवेळा प्रसंग घडलेले आसताना टाँमीने वेळोवेळी टाँमीने वाचविले असल्याचे सुनील महाजन यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

शेताचा मालकच टाँमी..
मेहुणबारे(ता.चाळीसगाव) येथील शेतकरी मन्साराम महाजन यांनी  टाँमी हा सहा महीन्याचे लहान पिलु होते.या टाँमीला त्यांनी भुसावळ येथुन आणले होते.आज हा टाँमी आठ वर्षांपासून येथे शेतात एकटा राहतो.या शेताकडे आज देखील कुणीही टाँमीमुळे फिरकत नाही.आजही टाँमीच्या भरवशावर श्री महाजन हे गुरे देखील सोडून येतात.रात्रदिवस शेतात राखन करणारा टाँमीच शेताचा मालक असल्याची बोलकी प्रतिक्रिया मन्साराम महाजन यांनी सकाळ शी बोलताना व्यक्त केले.