
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकात पाटील यांच्यात सरळ सामना होणार आहे.
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकात पाटील यांच्यात सरळ सामना होणार आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. मुक्ताईनगरमधून भाजपकडून रोहिणी खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे ऍड. रवींद्रभैय्या पाटील व विनोद तराळ तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, आजच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार उमेदवारी माघार घेतल्याचे विनोद तराळ यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यासह मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार असल्याचेही तराळ म्हणाले.
राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी माघारी घेतल्याने आता मुक्ताईनगर मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत भाजपच्या रोहिणी खडसे यांच्या विरूद्ध उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे मुक्ताईनगरात आता भाजप विरूद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे.