अंगावर साधी जखम नाही तरी बिबट्याचा मृत्यू ?

धनराज माळी
Tuesday, 1 December 2020

नाशिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्याचा सीमावर्ती भागातील साक्री वनक्षेत्र हद्दीतील सिंदबन शिवारातील संजू ठेलारी यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचा अंगावर साधी जखमही नव्हती, त्यामुळे त्याच्‍या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. 

ढोर बाजारात विक्रीसाठी आली आणि गायीने आश्चर्यकारक अशी लाखात एक घटना घडवली -

बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार नंदुरबार वनविभागाचे व साक्री वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले. पशुवैद्यकीय अधिकारी अहिरे यांनाही घटनास्थळी बोलविण्यात आले. तपासणीत बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे जखमा मिळून आल्या नाहीत. त्यामुळे प्रथमदर्शनी बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी एस. आर. कोळेकर यांनी शवविच्छेदन केले.

अवयव नाशिकला रवाना

मृत बिबट्याचे अवयव तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नाशिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. यावेळी नंदुरबार वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, वनपाल युवराज भाबड, वनरक्षक अरविंद निकम, भानुदास वाघ, ममता पाटील, ठाणेपाडा पोलिसपाटील दिनेश बागूल, वनरक्षक शीतल बोरवणे, संजय पाटील, आबा बागूल यांच्या उपस्थितीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar although not a simple injury to the limb leopard died