
देशातील व राज्यातील काही विघ्नसंतोषी पक्षांनी या बिलाला विरोध दर्शवत मागील गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून दिल्लीसह राज्यभरात निदर्शने केले जात आहे.
नंदुरबार ः भारतीय जनता पक्षातफेर् आज जागतिक किसान दिनाचे औचित्य साधून नंदूरबार जिल्हा किसान मोर्चातर्फे आज मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी हिताच्या तीन बिलांचे दुधाने अभिषेक करून स्वागत केले. तसेच राज्यातील आघाडी सरकारचा निषेध केला.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास हे आमदार देणार 21 लाख
राज्यात आणि देशात मोदी सरकारने पारित केलेल्या शेतकरी हिताच्या या बिलाला मोदीविरोधी देशातील व राज्यातील काही विघ्नसंतोषी पक्षांनी या बिलाला विरोध दर्शवत मागील गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून दिल्लीसह राज्यभरात निदर्शने व आंदोलने करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची आणि दलालांची हितं उधळणाऱ्या या बिलाला पारित करून शेतकऱ्यांचे कल्याण केले.तरीही या बिलाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आज नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा चौकात शेतकऱ्यांच्या बिलावर दुधाने अभिषेक करून स्वागत केले.
आवर्जून वाचा- कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने मिळवीले लाखोचे उत्पन्न -
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा जिल्ह्याच्या खासदार डॉ हिना गावीत, नंदुरबार जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष संगिता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा ऐजाज शेख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य डॉ किशोर पाटील, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस शरद जाधव, किसान मोर्चा सदस्य भरत पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपुत, युवा मोर्चा चिटणीस अश्विन सोनार, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, आदिवासी मोर्चा शहर उपाध्यक्ष गोरख नाईक, शहर सरचिटणीस मुकेश अहिरे, शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, निर्मल शर्मा, राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे