गायत्री मंत्राला मद्यप्राशसनाशी जोडणारे विडंबन भोवले; गुजरातचा अभिनेतासह ५ जणांविरोधात पोलिसात तक्रार 

धनराज माळी
Tuesday, 1 December 2020

विडंबनाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना आणि श्रद्धा दुखवल्या. हिंदू धर्माबद्दल मनात द्वेष भावना बाळगुन एका राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसे प्रसारित केले.

नंदुरबार ः गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदु सेवा समितीचे नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गज्जूभाईचे पात्र गाजवणारा गुजरातचा विनोदवीर सिद्धार्थ रंधेरिया सह ५ जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. 

आवश्य वाचा- ढोर बाजारात विक्रीसाठी आली आणि गायीने आश्चर्यकारक अशी लाखात एक घटना घडवली -

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिद्धार्थ रंधेरिया या गुजराती नायकाचा गज्जूभाईनी गोलमाल हा विनोदी कार्यक्रम प्रसारित होत असतो. त्याचे काही भाग युट्युब वरूनही प्रसारित होत असतात. त्यापैकी एका दृश्यात नायिका डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करतांना दाखवले आहे.

त्याचवेळी नायक (सिद्धार्थ रंधेरिया) हा तीचे डोळे बंद असल्याची खात्री करीत बाटलीतील दारु तिच्या पुढील तांब्याच्या कलशात टाकतो. नायिकेच्या पाठो-पाठ नायक ढेकर- डकार दिल्या प्रमाणे मंत्रोच्चार करून विडंबन करतो. मंत्रा विषयी अनेक विनोद करतो. नंतर भू चा अर्थ पाणी व र्भुव: स्व: म्हणजे मोटोडो घोटोडो म्हणजे मोठे घोट घेणे, असे मंत्राचे चुकीचे अर्थ सांगतानाचेही दृश्यात दिसते. वस्तुत: गायत्री मंत्र हा वेद मंत्र असून प्रत्येक धार्मिक विधी मध्ये म्हटला जातो, असे नमूद करून फिर्यादीत म्हटले आहे की या कार्यक्रमातील नायक नायिका दिग्दर्शक पटकथालेखक आणि निर्माता यांनी नियोजन पुर्वक कट रचून संगनमताने पूर्ण देशभर हिंदू धर्माची बदनामी केली.

वाचा- नंदुरबारला दोन तासातच आटोपले मतदान 
 

विडंबनाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना आणि श्रद्धा दुखवल्या. हिंदू धर्माबद्दल मनात द्वेष भावना बाळगुन एका राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसे प्रसारित केले. म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्वरीत अटक करुन त्यांना कडक शासन करावे,असे नरेंद्र परशराम पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar complaint against five people including a gujarat actor for gaytri mantra