ना आरोग्‍य तज्ञ, ना बालरोग तज्ञ; तरीही कुपोषण केले कमी

धनराज माळी
Thursday, 3 September 2020

समाजात ट्रॅव्हलिंग न्युट्रिशियन चॅम्पियन्स चा विकास केला असून ते ‘कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्स (सीएनडब्ल्यूज) या नावाने ओळखले जातात. या वर्कर्स ना सार्वजनिक आरोग्य तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ आणि सामाजिक विकास तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.त्यांना चांगल्या पोषणाच्या गोल्डन रूल्सबाबत प्रशिक्षित करण्यात येते.

नंदुरबार  राज्यातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुपोषणात डेटॉल बीएसआय- न्युट्रिशन इंडिया प्रोग्रामच्या पहिल्या वर्षी यशस्वी आयोजन केल्यानंतर ७.४ टक्के घट दिसून आली आहे. पहिल्या दहा महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमाच्या माध्यमातून ४१ कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्सच्या मदतीने १ ते ५ वर्षांतील सुमारे साडे सहा हजार मुलांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. 
सस्टेनेबल स्क्वेअर या स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे आढळून आले की, बीएसआय न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम मध्ये एक रूपयांची गुंतवणूक केल्यास त्याचे सामाजिक मुल्य हे ३६.९० रूपये इतके मिळते. पाच वर्ष चालणाऱ्या या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत बालकांच्या पहिल्या एक हजार दिवसांमध्ये त्यांना मदत केली जाते. महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरोदर महिला आणि बालकांच्या पोषणाचा तसेच स्वच्छतेचे प्रमाण यांचा अभ्यास करण्यासाठी डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारीत नाविन्यपूर्ण मॉड्यूल्सचा उपयोग केला जातो. 

गेल्या वर्षभरापासून न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम राबविला जात आहे. समाजात ट्रॅव्हलिंग न्युट्रिशियन चॅम्पियन्स चा विकास केला असून ते ‘कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्स (सीएनडब्ल्यूज) या नावाने ओळखले जातात. या वर्कर्स ना सार्वजनिक आरोग्य तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ आणि सामाजिक विकास तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.त्यांना चांगल्या पोषणाच्या गोल्डन रूल्सबाबत प्रशिक्षित करण्यात येते.

 

चाळीस टक्‍याने कमी करण्याचा प्रयत्‍न
सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता आणि बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कम्युनिटी न्युट्रिशन वर्कर्सना या कार्याशी संबंधित सर्व गोष्टींचे ज्ञान देण्यात येत असून यांत गरोदरपणात मातांनी घ्यायची काळजी, त्यांनी त्यांच्या जेवणात कसला समावेश करावा, स्तनपानाचे प्रशिक्षण, बाळंत झाल्यावरच्या एका तासातील स्तनपानाचे महत्त्व, नवजात अर्भकासाठी स्तनपान तसेच बाळामध्ये कुपोषणाची लक्षणे दिसून आल्यास बाळाला कोणत्या प्रकारचा आहार द्यावा, याबद्दलची माहितीचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पुढील चार वर्षांच्या कालावधीत एक हजार गावांमधील एक लाख ७७ हजार कुपोषित महिला आणि बालकांपर्यंत पोहोचून पाच वर्षांखालील मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ४० टक्के कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
 

“समाजात मोठे बदल घडवण्यासाठी पोषण आणि स्वच्छता हे दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. यातून महिला आणि मुलांचे सक्षमीकरण करणे शक्य असते. महाराष्ट्रातील अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कुपोषणाचे वाढते आकडे पाहून आम्ही आमचा न्युट्रिशन इंडिया प्रोग्राम हा प्लॅन इंडियाच्या सहकार्याने सुरू केला. पाच वर्ष चालणाऱ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत गरोदर महिला आणि बालकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषण या गोष्टी बळकट करण्यावर जोर देण्यात येणार आहे.” 

- गौरव जैन, उपाध्यक्ष, रेकिट बेनकिसर हेल्थ. 

संपादन  राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar aadivashi aria Malnutrition sevan percent down