esakal | अजबच..रूग्णवाहिका नादुरूस्त मग चालक दोषी 
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance malfunction

जिल्ह्यात आरोग्य विभागाला बी.व्ही.जी.कंपनीतर्फे रूग्णवाहिका सेवा पुरविली जात आहे. गेली सहा वर्षे काही पायलट सेवा बजावत आहेत. सहा वर्षे चांगली सेवा बजावणाऱ्या या चालकावर कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.

अजबच..रूग्णवाहिका नादुरूस्त मग चालक दोषी 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : रूग्णवाहिका जेवढी महत्वाची आहे, त्याहीपेक्षा महत्वाची भूमिका रूग्णवाहिका चालकांची असते. स्वतःचा जीव धोक्यात घालून एकीकडे रूग्णाला लवकरात लवकर रूग्णालय पोचविण्याची त्यांची धडपड असते. त्यासोबतच कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कंपनीत सेवारत आहेत असे असताना रूग्णवाहिकांच्या पाट्यासह इतर नादुरूस्तीचा दोष चालकांवर देणे कितपत योग्य आहे? याबाबत कंपनीचा वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात आरोग्य विभागाला बी.व्ही.जी.कंपनीतर्फे रूग्णवाहिका सेवा पुरविली जात आहे. गेली सहा वर्षे काही पायलट सेवा बजावत आहेत. सहा वर्षे चांगली सेवा बजावणाऱ्या या चालकावर कंपनीच्या महिला अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. संबधित पायलट दिवसाला किती पाटे तोडतो ते विचारा त्यांना, असा उलट प्रश्न त्यांनी प्रतिक्रिया देताना केला. मात्र जर संबधित चालक दिवसाला गाडीचे पाटे तोडून नुकसान करत आहे. तुम्ही त्याला पाच -सहा वर्षे सेवेत ठेवलेच का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

संबधित पायलट कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल तर कंपनीने कारवाई कऱणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. आता रूग्णवाहिका नादुरूस्त झाली, त्याने ती लवकरात लवकर दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे तगादा लावला. तर उलट त्या चालकाला कामावर न येण्याचे बजाविण्यात आले. संबधित चालकाने सकाळकडे तक्रार केली. त्यानुसार कंपनीचा अधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न केले असता एका महिला अधिकाऱ्याने मूळ विषय सोडून भलतीच माहिती दिली. 

माझ्या गाडीत प्रथमच बिघाड 
संबधित रूग्णवाहिकेवरील पायलटच्या म्हणण्यानुसार तो जी रूग्णवाहिका चालवितो, तिच्यात सेवेत रूजू झाल्यापासून प्रथमच बिघाड झाला. सहा वर्षांत गाडीचा एकही पाटा तुटलेला नाही. तुटला असता तर कंपनीने माझ्यावर कारवाई केली असती. उलट सहा वर्षे होत आले. प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. कोविड काळ असतांनाही सुट्या न घेता काम केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे