esakal | तर..मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही!-चंद्रशेखर बावनकुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Bavankule

तर..मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही!-चंद्रशेखर बावनकुळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ


नंदुरबार ः महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) म्हणजे तीन चाकाची आटो आहे. यांनी केलेला भ्रष्टाचार, अत्याचारामुळे नागरिकांमध्ये आक्रोश वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) रद्द होण्यास हेच सरकार जबाबदार आहे. त्यांनी वेळेत डाटा न्यायालयात सादर केला नाही. उलट ते केंद्र शासनाकडून डाटा मागत आहेत. त्यात ६९ लाख चुका आहेत. त्यापेक्षा तीन महिन्यात नवीन इमेरिअल डाटा तयार होऊन सादर येणे शक्य आहे. मात्र तिन्ही पक्षातील नेते एकमेकांची कुरघोडी काढून मीडिया ट्रायलमध्ये वेळ घालवीत आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यात औबीसींचा इम्पेरिअल डाटा तयार केला नाही, तर महाआघाडीचा मंत्र्यांना भाजप (BJP) रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे महामंत्री व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी दिला आहे.

(chandrasekhar bavankule accused the mahavikas aghadi government obc reservation issue)

हेही वाचा: चेन्नईमधील या कॅफेमध्ये रूचकर पदार्थांचा नक्की आनंद घ्या!


भाजपच्या युवा मोर्चातर्फे युवा वॉरिअर अभियान राज्यभर राबविले जात आहे. त्यानिमित्त गुरूवारी श्री.बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश संघटन चिटणीस अनुप मोरे व पदाधिकारींचा ताफा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने ज्या योजनेत भ्रष्टाचार करता येत नाही, त्या योजना बंद पाडल्या. विशेषतः डिबीटी योजनेत काहीच मिळत नाही म्हणून रोजगार हमी योजना, संजय गांधी योजना, आपत्ती व्यवस्थापन योजना बंद पाडल्या आहेत. डि.पी.डि.सी.चा पैशांनाही कट मारला आहे. खावटीचा पैसाही थांबविला आहे. राज्यात एकही पालकमंत्री काम करत नाहीत. मंत्री पदाचा वापर केवळ स्वतःचा मतदार संघासाठी करीत आहेत. एक हजार कोटीचा तांदूळ घोटा झाला, आता रेशनचा तांदुळही या सरकारला पुरला नाही, असे या सरकारचे काम आहे. पंढरपूरला तिन्ही पक्ष आले तरी तेथील जनतेने यांना नाकारले, तशीच स्थिती धुळे, नंदुरबार, जळगावमध्येही आहे. आगामी निवडणुकीत जनता यासरकारला नाकारल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा: अवैध्य चालत्या फिरत्या बायोडिझेल पंपावर पोलिसांची कारवाई

चौकशीला तयार मात्र योजना थांबवू नका
जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत चांगली आहे. त्यांनी कोणतीही चौकशी करावी, आम्ही तयार आहोत. मात्र चांगली योजना थांबवू नये. खोटा बोला पण रेटून बोला असे, या महाविकास आघाडीचे काम आहे.


नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा
नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पाऊस नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी दुबार पेरणीसाठी हताश झाले आहेत. त्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान देणे दूर मात्र या सरकारचा मंत्र्यांना एकमेकांच्या उण्यादुण्या काढण्यातच वेळ पुरत नाही. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची गंभीर स्थिती आहे. हा जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी आपली शासनाकडे मागणी आहे.

loading image