esakal | दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना; फटाके फोडण्यासाठी लावले निकष
sakal

बोलून बातमी शोधा

diwali festival

दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून त्‍याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे. 

दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना; फटाके फोडण्यासाठी लावले निकष

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही. पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. 

दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून त्‍याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे. 

इतक्‍या डेसिबल आवाजाचे फटाके
साखळी फटाक्यांत ५०, ५० ते १०० व १०० त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसिबल एवढी असावी. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दारूकाम व फटाक्याचा वापर करता येणार नाही. 

तर कायदेशीर कारवाई
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे १०० मीटर पर्यंतचे क्षेत्रात शांतता प्रभागात फटाक्याचा वापर करता येणार नाही. फटाका विक्री परवाना दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. परवाना मिळाल्याखेरीज फटाका विक्री करणे अवैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

ही प्रोसेस करावी लागणार पुर्ण
फटाका विक्री व साठवणुकीसाठीचा विहित नमुन्यातील परवानगी अर्ज १२ ते २० ऑक्टोबरपर्यंत‍ वितरित करण्यात येतील. अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत राहील. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव विचारात घेता फटका स्टॉलच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, आदेश तसेच सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे