नंदुरबारमधील तो रूग्ण कोरोनाचा नाही 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

नंदुरबार : नंदुरबार शहरात कोरोनाचा रूग्ण असल्याच्या वृत्ताने आज दुपारीनंतर खळबळ उडाली,मात्र तो रूग्ण कोरोनाचा नसून सौदी अरेबियातून आल्यानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करीत नमुने घेण्यात आले आहेत. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या रूग्णाला कोरोनाचा संशयित असे म्हणता येणार नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

नंदुरबार शहरातील तीन जण काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियात गेले होते,ते नुकतेच परतले असून त्यांतील एकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने आज खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ते परदेशातून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले,. तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सातपुते यांनी त्यांची तपासणी करून विविध नमुने तपासणीसाठी घेतले. यात रक्त ,लघवी तसेच कोरोनाशी संबंधित नमुने घेतले असू न ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. 
घटनेची माहिती शहरात होताच कोरोनाचा रूग्ण आढळल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेने नागरिकांत एकचे खळबळ उडाली आणि जो तो वृत्तपत्रांच्या कार्यालयात चौकशी करू लागला काही वेळातच वातावरण भितीमय ०होऊन ही बातमी संपूर्ण सोशल मिडियाद्वारे जिल्हा आणि राज्यभर पसरली. मात्र वैद्यकीय सूत्रांशी संपर्क केला असता त्यांनी पूर्वखरबरदारी म्हणून त्या रूग्णाच्या अधिक तपासण्या करण्यात आल्याचे सांगितले. यात हा रूग्ण संशयित नाही किंवा बाधित नाही याचा खुलासा करीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus no positive ditect pecents