esakal | सोशल मिडीयावरून अंडी, चिकन तेजीत; माहिती होतेय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

ege and chicken

सध्या कोरोना आपत्ती काळात अनेक जण आहाराच्या बाबतीत जागृत झाले असल्याने सध्या पोस्टीक आहारावर भर दिला जात आहे. त्यामध्ये अंडी, चिकन मध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांना देखील दररोज आहारात अंडी दिली जात आहे.

सोशल मिडीयावरून अंडी, चिकन तेजीत; माहिती होतेय व्हायरल

sakal_logo
By
किशोर चौधरी

बामखेड (नंदुरबार) : कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेले गैरसमज आणि परतलेल्या अफवांमुळे कुकुट पालन व्यवसाय कोलमडला होता. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले. मागणी अभावी अंडी आणि कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या, मात्र आता प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अंडी चिकन खाण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून मिळत असल्याने कुकूटपालन व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. अंड्याचे दर प्रति नग ७ रुपये पर्यंत चिकनचे दर प्रति किलो २०० रुपयांपर्यंत गेल्याने या व्यवसायाला अच्छे दिन आले आहे. 

सध्या कोरोना आपत्ती काळात अनेक जण आहाराच्या बाबतीत जागृत झाले असल्याने सध्या पोस्टीक आहारावर भर दिला जात आहे. त्यामध्ये अंडी, चिकन मध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे त्याला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांना देखील दररोज आहारात अंडी दिली जात आहे. मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे. सध्या किरकोळ अंडी सात रुपयाला नंतर चिकनच्या दर दोनशे रुपये किलो इतका आहे कोरोना सुरुवातीच्या काळात चिकन विषयी गैरसमज निर्माण झाला होता त्यामुळे दर झपाट्याने उतरला होता शंभर रुपये किलोपर्यंत सुरुवातीला उतरला त्यानंतर काही पोल्ट्री मालकांनी तर फुकट कोंबड्या वाटून टाकल्या याच काळात मटण दरात वाढ झाली. त्यानंतर चिकनला पुन्हा चांगले दिवस आले, तसेच माल नसल्यामुळे दरातही वाढ चांगली झाली. शहादा तालुक्यात शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत त्याबरोबर त्याच्या उपचार करण्यासाठी हॉस्पिटल केअर सेंटर सुरू झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांना आहार दिला जातो. आहारात दूध, अंडी यांचा समावेश आहे. त्यांच्या किरकोळ दर पंधरा दिवसापूर्वी पाच रुपये इतका होता परंतु मागणी वाढल्यामुळे दरात वाढ करण्यात आले आहे मागणी वाढल्यामुळे चिकनच्या दरात आठवड्यात दोनशे रुपये वाढ करण्यात आली आहे शहरी भागात चिकन १८० रुपये किलो तर ग्रामीण भागातील दर मात्र दोनशे रुपये किलोपर्यंत आहे. मागणी वाढल्यामुळे अंडी व चिकन आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. 

सोशल मीडियावरून जागृती 
कोरोना आपत्तीच्या काळात सोशल मीडियावरुण तसेच इतर माध्यमातून नागरिकांना सकस आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून दिले जाते त्यासाठी गोळ्या औषधांबरोबर अंडी व चिकनच्या समावेश करण्यास सांगितले जाते आहे. रुग्णां बरोबर सध्या इतर नागरिकांनाही प्रोटीन्ससाठी अंडी व चिकन खात आहे. गेल्या काही दिवसात अंडी आणि चिकनला मागणी वाढली आहे त्याचा परिणाम म्हणून दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यात त्यात थोडी ती घसरण होऊन सध्या पाचशे रुपये किलो मटण विक्री होत आहे. मटण दरातील वाढीमुळे देखील अनेकांनी चिकनला पसंती दिली असल्याने चित्र शहादा शहरात दिसून येत आहे. 

कोविड रुग्णालयात अंडी वाटप 
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांनी अंडी चिकन खावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. कोविंड उपचार केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात आहेत यामुळे अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि मागणीत वाढ असल्याने अंडी चिकनचे दर वाढले आहेत. सध्या पोल्ट्री धारकांकडून पाच ते सव्वा पाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे, तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे