कोरोनाता कहर : नंदुरबार जिल्हा ५००० 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात १६ हजारावर व्यक्तींची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत पाच हजार ११३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ११२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. चार हजार ६१ रूग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. माझे कुटुंब ,माझी जबाबदारी मोहिमेस दोन दिवसापासून जोरात सुरूवात झाल्याने आरोग्य यंत्रणा घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. त्यातून लक्षणे असलेल्या संशयित रूग्णांची तत्काळ स्वॅब तपासणी केली जात आहे. त्यामुळे दोन दिवसापासून स्वॅब तापसणीचा आकडा वाढला आहे.त्यासोबतच पॉझिटिव्हची संख्याही वाढत आहे. आजअखेर पाच हजार शंभरावर पॉझिट्वह रूग्णांचा आकडा गेला आहे. 
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात १६ हजारावर व्यक्तींची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत पाच हजार ११३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ११२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. चार हजार ६१ रूग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. सध्या स्थितीत ८७८ रूगणांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्यांपैकी २१९ रूग्णांची प्रकृती चांगली झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज एकाच दिवसात एवढे रूग्णांना बरे होऊन सोडण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोविड-१९ वर मात करता येऊ शकतो. असा संदेश या रूग्णांचा माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. 

कोविड-19 उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती* 
२४ सप्टेंबर २०२० 
नंदुरबार-७३*शहादा-77 
नवापूर-१९ 
तळोदा-२१ 
क्कलकुवा-२३ 
धडगाव-00 
बाहेरील जिल्हा-०६ 

एकूण-२१९ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar coronavirus five thousand cross