esakal | सातपुड्याचा पायथ्याशी दिंडण नृत्याची धूम 
sakal

बोलून बातमी शोधा

didan dans imege

गेर नृत्याचे एक वर्षा आड म्हणजे दर दुसऱ्या वर्षी आयोजन केले जाते. या नृत्याचे कार्यक्रम धूलिवंदनापासून आयोजित करण्यात येते. एका गावात पाच ते सहा तास हे नृत्य केले जाते.

सातपुड्याचा पायथ्याशी दिंडण नृत्याची धूम 

sakal_logo
By
जसपाल वळवी

वाण्याविहीर: सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील आलिविहीर (सोजडान) येथे गेर दिंडण (याहा डिंडन ) नृत्याच्या सुरूवात झाली आहे. होलिकोत्सवात करण्यात येणाऱ्या या गेर दिंडन नृत्यास दरवर्षी युवक सहभागी होतात. यंदाही या नृत्यास तब्बल ३१६ मुलींनी सहभाग नोंदविला आहे. यात विशेष म्हणजे जे मुले गेर नृत्य करतात त्यांनांच मुली म्हटले जाते.होळीनंतर आता दिंडण नृत्याची धूम सुरी झाली आहे. 

या होळी उत्सवात साजरा करण्यात येणारे हे गेर नृत्य सातपुड्याच्या पायथ्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सदर गेर नृत्याचे एक वर्षा आड म्हणजे दर दुसऱ्या वर्षी आयोजन केले जाते. या नृत्याचे कार्यक्रम धूलिवंदनापासून आयोजित करण्यात येते. एका गावात पाच ते सहा तास हे नृत्य केले जाते. सकाळी १०.३० पासून ते सायंकाळी ४.३० पर्यंत नृत्य होत असते. यंदाही धूलिवंदनाच्या दिवसी सोजडान येथून सुरूवात होऊन परिसरातील कोणत्या गावात गेर (डिंडन) नृत्य होणार याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 

या दिवशी येथे होणार गेर नृत्य 
१२ मार्च पिपरपाडा (ता.अक्कलकुवा), १३ मार्च इच्छागव्हाण (ता. तळोदा ), १४ मार्च नाला ( ता. अक्कलकुवा), १५ मार्च अमलपाडा १६ मार्च चोखीआमली (ता. कुकरमुंडा, गुजरात), १७ मार्च सतोना (ता. तळोदा), १८ मार्च मोदलपाडा, १९ मार्च मांडवी आंबा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 

सत्तर वर्षाची परंपरा 
आलिविहीर (सोजडान) येथील लोकप्रिय गेर डिंडन १९५१- ५२ मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती. ही परंपरा त्याच्या नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या दहा पंधरा दिवसाअगोदर पासून सुरु होणाऱ्या गेर डिंडनच्या नृत्यात सहभागी होणाऱ्या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतो. 

असा असतो पेहराव 

नृत्यास येणाऱ्यास धोती आणि पगडी, पातळ असलेल्या पेहराव असतो. हातात दिंडन घेऊन बासरी, मांडूल, ताठ यांच्या तालावर ते गेर दिंडनच्या नऊ चाली असतात. सध्या सहभागी झालेले युवक व प्रौढवयीन पुरूष ज्या गावत नृत्य असेल तेथेच मुक्काम करावा लागतो. 


हे आहेत नियम 

या काळात ते नृत्यासाठी आलेले युवक व प्रौढ 
आंघोळ करत नाहीत. केवळ ते स्वतःचे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. स्री सहवास टाळवा लागतो, पायात चप्पल न घालणे, पाणी न ओलांडाणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. सोजडान येथे होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र जमणारे गावाचे कारभारी, प्रमुख आपापल्या गावांचे निमंत्रण घेऊन नृत्याच्या आयोजनाची मागणी करतात. 

हे करताहेत नेतृत्व 

सोजडान येथे सुरू असलेल्या या नृत्यात पुजरा (पुजारी) म्हणून प्रेमराज जगन वर्ती, गेमु सुरजा पाडवी, बासरी वादक लालसिंग राया पाडवी, रेसा पाडवी, मांडूल वादक म्हणून जयसिंग वळवी, नगरावादक रामसिंग नावल्या पाडवी, जवरसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गेर डिंडन नृत्य सुरू आहे. आलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग बटेसिंग पाडवी, जगतसिंग गटवरसिंग पाडवी, प्रेमराज सुमेरसिंग पाडवी हे दरवर्षी नृत्याचे आयोजन करतात. यावेळी गेर दिंडन नृत्याच्या या कार्यक्रमाची पाहण्यासाठी जिल्ह्य़ातील मोठ्या संख्येने गेर नृत्य पाहण्यासाठी भाविक हजेरी लावतात.