पिपर्डेच्या जवानाचा काश्‍मीरमध्ये मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

जम्मू आणि काश्‍मीरमधील उधमपूर युनिट-57 मध्ये कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने लष्कराच्या उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मंदाने : पिपर्डे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जवान गौतम रंगराव चव्हाण (वय 25) यांना शनिवारी उधमपूर येथे वीरमरण आले. आर्मीमध्ये जम्मू आणि काश्‍मीरमधील उधमपूर युनिट-57 मध्ये कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने लष्कराच्या उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृतदेह आज (ता. 29) सकाळी ओझर येथे लष्कराच्या विमानाने आणण्यात येणार आहे. वीर जवान गौतम हे अविवाहित होते. त्यांचे शिक्षण बी. एस्सी. झाले असून, त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. त्यांचे वडील शेती करतात. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district death of Jawana kashamir border