esakal | नंदुरबार जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच;तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

नंदुरबार जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच;तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
धनराज माळी


नंदुरबार : जिल्ह्यात अक्कलकुवा -तळोदा व शहादा -प्रकाशा रस्त्यावर दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात (Accident) तीन जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. याबाबत तळोदा व शहादा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

हेही वाचा: योजनांचा लाभ मिळवून देणारे रॅकेट सक्रिय..बोगस लाभार्थ्यांना लाभ?


गुरूवारी (ता. २) दुपारी एक ते दीडच्या सुमारास कुंडल (ता. धडगाव) येथील विनेश बिंदास पाडवी (वय २३) व खुंटामळी (ता. धडगाव) येथील भिका गीना पाडवी (वय २२) हे दोन युवक अक्कलकुवाकडून तळोदाकडे दुचाकी (एम एच- १८ एक्स ५१७५) ने जात होते. यावेळी तळोदाकडून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो (एम.एच-३९ डी ४ डीएस २१७२) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने गाडी चालवत समोरील दुचाकी स्‍वारांना सतोना फाट्याजवळील अरुंद फरशी जवळ जोरदार धडक दिली. त्यात विनेश पाडवी व भिका पाडवी या दोघा तरुण दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर वाहन चालक मात्र तेथून पसार झाला. याबाबत इंद्रा पाडवी यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा: धुळे कृआबाचा ऐतिहासिक निर्णय..अडत्याशिवाय होणार शेतमालाची खरेदी

प्रकाशा रस्त्यावर अपघात
दुसऱ्या घटनेत गुरूवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास शहादा प्रकाशा रस्तावर दगा भगवान पाटील ( वय ५५, अयोध्या नगर शहादा) हे मोटरसायकल (एम एच ३९ , एम ११ ५०) वरून शहादाकडे जात होते. यावेळी समोरून येणारे मोटर सायकल (एमएच ३९ एल ६३७०) ने जोरदार धडक दिली. त्यात अपघात होऊन दगा भगवान पाटील हे गंभीर जखमी झाले व त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सोनू पाटील यांनी शहादा पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अज्ञात मोटरसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

loading image
go to top