सिंचन प्रकल्पात आठ दिवसांत दुप्पट साठा 

धनराज माळी
Saturday, 22 August 2020

साधारण १० ऑगस्‍टपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात संततधार सुरूच होती. शुक्रवारी साधारण १२ दिवस झाले आहेत. त्यात दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

नंदुरबार  ः जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील साठ्यात आठवडाभरात दुप्पट वाढ झाली आहे. गेले दहा दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे सिंचन प्रकल्प ७० टक्के भरले आहेत. दरम्यान, कोरडी (नवापूर) मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात आजमितीला ७६ टक्के साठा आहे. मागील वर्षी या दिवसाअखेर या प्रकल्पात शंभर टक्के साठा होता, तर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण ७५ टक्के साठा होता. 

जिल्ह्यात चार मघ्यम व ३६ लघु प्रकल्प आहेत. त्यात महत्त्वाचे केवळ १२ लघु प्रकल्प आहेत. हे प्रकल्प शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरले आहेत. त्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच प्रकल्पांच्या माध्यमातून सोडविला जातो. मागील १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह साऱ्यांनीच पावसाला साकडे घातले होते. पिके पावसाअभावी कोमेजू लागली होती. मात्र साधारण १० ऑगस्‍टपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात संततधार सुरूच होती. शुक्रवारी साधारण १२ दिवस झाले आहेत. त्यात दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र गेले आठ दिवस संततधार सुरूच होती. १० ऑगस्‍टपूर्वी सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा होता. त्यामुळे या वर्षी सिंचन प्रकल्प पुरेसे भरतील की नाही, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. मात्र १० ऑगस्‍टपासून सुरू झालेल्या पावसामुळे १४ ऑगस्‍टपर्यंत साधारण मध्यम प्रकल्प ६५ टक्के, तर लघु प्रकल्प ४४ टक्के भरले होते. त्यानंतर शुक्रवारच्या अपडेटनुसार सिंचन प्रकल्पात ७० टक्के साठा झाला आहे. मध्यम प्रकल्पामध्ये ७५ टक्‍के, तर लघु प्रकल्पांमध्ये ७० टक्के साठा आहे. 

प्रकल्पानिहाय साठा असा ः 
सिंचन प्रकल्प - जलसाठा (टक्के) 
मध्यम प्रकल्प (७५ टक्के) 
- शिवण (वीरचक)- ७६ 
- दरा (शहादा) - ७३ 
-नागन (भरडू)- ६४ 
कोरडी (पळशी) -१०० 

लघु प्रकल्प - (७० टक्के) 
-मेंदीपाडा - ४९ 
-वागदी- ९७ 
-शिरवे- १०० 
-नटावद- १०० 
-बलदाणे- २९ 
-चौपाळे - ५७ 
-घोटाणे- १०० 
-नवलपूर- ३७ 
-खैरवे -१०० 
-चिरडा- ३५ 
धनपूर- १०० 
-भुरीवेल - १०० 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Due to good rains, irrigation project in Nandurubar district is full in eight days