चार कोटी खर्चूनही जीव धोक्‍यात घालून कसरत

रमेश पाटील
Friday, 28 August 2020

वडाळी ते काकरदा रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाले. त्यासाठी चार कोटी रुपये खर्च केला. मात्र वडाळी गावालगतच्या रंगूमती नदीवर रस्ता तयार करण्यात आदी पूल बांधणे गरजेचे होते. नदीला पावसाळ्यात पूर आला की परिसरातील नागरिकांचे हाल होतात.

सारंगखेडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वडाळी ते काकर्दा दरम्यान रस्ता तयार करण्यात आला. त्यासाठी चार कोटी रुपये खर्चही केले; मात्र वडाळी (ता. शहादा) गावाजवळ असलेल्या रंगूमती नदीवर पूल बांधण्यात आला नसल्याने चार कोटी रुपयांचा रस्ता बांधूनही गावाचा संपर्क खंडित होणे काही टळले नाही. पावसाळ्याचा पाण्यात जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करून रंगुमती नदीवर पूल बांधावा अशी मागणी करण्यात आली आहे.

वडाळी ते काकरदा रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाले. त्यासाठी चार कोटी रुपये खर्च केला. मात्र वडाळी गावालगतच्या रंगूमती नदीवर रस्ता तयार करण्यात आदी पूल बांधणे गरजेचे होते. नदीला पावसाळ्यात पूर आला की परिसरातील नागरिकांचे हाल होतात. म्हणून त्वरित पूल बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .पूल नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यात उतरून पुढे जावे लागते पाण्यात वाढ झाली की धोका निर्माण होतो . गेल्या वर्षी या नदीवरून गुरे वाहून गेल्याची घटना घडली होती .

विकासाला चालना मिळाली
वडाळी ( ता. शहादा ) ते काकरदा खुर्द आणि दिगर या गावांचा दैनंदिन रोजचा संपर्क वडाळी गावात असतो या दरम्यान रस्ता व्हावा या शासनाच्या छोटी गावे मोठ्या गावाला जोडण्याच्या उद्देशाने खासदार डॉ हिना गावित, आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नव्याने चार कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला . त्यामुळे काकर्दा व अभाणपुर हे गावे वडाळी पासून फक्त सहा किलोमीटरचे अंतर कमी झाल्याने दोघही गावांचा रोजचा दैनंदिन व्यवहार वाढला. वडाळी गाव बाजारपेठेचे गाव आहे या गावाला जोडल्याने विकासाला चालना मिळाली . 

पावसाळ्यात जिव धोक्यातुन प्रवास .
नदीला पावसाळ्यात दोन ते तीन महिने भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असतो. काकर्दे वासियांना पुन्हा मागचेच दिवस बघायला मिळतात त्यांना तोरखेडा (ता. शहादा) येथे बारा किलोमीटर अंतर कापून पायपीट करत वडाळी , तोरखेडा येथे बाजारपेठेत यावे लागते . वडाळी येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ही नदीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनाही नदीच्या पाण्यात उतरून संघर्ष करीत प्रवास करावा लागतो वास्तविक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपये खर्च करून नव्यानेच रस्ता केला त्या अगोदर रंगुमती नदीवर पूल बांधणे गरजेचे असताना प्रशासनाने मात्र ते दुर्लक्षितच केले असल्याचे काकर्दा दिगर खुर्द अभानपुर येथील ग्रामस्थ संतप्त सवाल करीत आहे ग्रामस्थांची पूल बांधण्याची मागणी करीत आहेत .

वडाळी ते काकर्दा रस्ता ग्रामसडक योजनेतंर्ग झाला आहे परंतू रंगुमती नंदीवर पूल नसल्याने पावसाळयात गावांचा संपर्क तुटतो , यावर तातडीने उपाययोजना करावी , पावसाळयात नदीमध्ये पाणी असते अशावेळी धोका पत्कारुन पाण्यात उतरावे लागते व पुढील प्रवास करावा लागलो.
- विजय गिरासे. ग्रामस्थ, काकर्दा

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar four carrore Expenditure road repair but people not sefty