लॉकडाऊनमध्येही "नथीचा नखरा' का आहे हिट...युवतींनी घेतले चॅलेंज 

सम्राट महाजन
शनिवार, 23 मे 2020

सध्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांना इच्छा असो वा नसो पण घरीच थांबावे लागत आहे. पुरुषवर्ग तरी काही तरी अत्यावश्यक वस्तू घेण्याचा निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी साधत आहे, मात्र महिलांना क्वचितच तशी संधी मिळत आहे.

तळोदा : नटून - थटून लग्नात साडीवर काढलेला किंवा आता लॉकडाऊन काळात घरीच चांगला मेकअप करुन नऊवारी साडीतला नथीवरचा फोटो त्याचबरोबर आपल्या छान हसण्याने एक नव चैतन्य निर्माण करणारे महिलांचे विशेषतः युवतींचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून या फोटोंची मोठ्या प्रमाणावर क्रेज दिसून येत आहे. 'नथीचा नखरा' व 'फिरसे मुस्कुरायेगा इंडिया' चॅलेंज ऍक्‍सेपटेड या हॅशटॅगखाली महिलांचे स्टेट्‌स अपडेट होत आहेत. त्यामुळे जुन्या - नवीन आठवणींना चांगलाच उजाळा मिळत आहे त्याचबरोबर लॉकडाउनमध्ये वैतागलेल्या महिलांना अश्या ऍक्‍टिविटीमधून आनंद ही मिळत आहे.... 

सध्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांना इच्छा असो वा नसो पण घरीच थांबावे लागत आहे. पुरुषवर्ग तरी काही तरी अत्यावश्यक वस्तू घेण्याचा निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी साधत आहे, मात्र महिलांना क्वचितच तशी संधी मिळत आहे. त्यातून विरंगुळा म्हणून महिलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला असून महिलांना विशेषतः युवतींना आपले फोटो आपल्या नातेवाइकांना, मैत्रिणींना दाखविण्याची जणू एकच संधी उपलब्ध झाली आहे. सोशल मीडियावर विशेषतः व्हाट्सअँप व टिकटाँकवर युवतींचे फोटो तुफान धूम करीत आहेत. व्हाट्सअँपच्या माध्यमातून दहा मैत्रिणींना 'नथीचा नखरा' व 'फिरसे मुस्कुरायेगा इंडिया' चॅलेंज ऍक्‍सेपटेड या हॅशटॅगखाली चॅलेंज पाठविण्यात येत आहे. ते चॅलेंज स्वीकारल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या स्टेट्सला नटून - थटून लग्नात साडीवर काढलेला किंवा ज्या महिलेकडे अथवा तरुणीकडे असे फोटो नाहीत त्यांनी लॉकडाउनमध्ये घरीच नटाफटा करुन काढलेला नथीवरचा फोटो तसेच आपली मस्त स्माईल असलेला फोटो अपलोड करण्यात येत आहेत. स्टेट्सवर अपलोड करण्यात आलेला फोटोवर छान कमेंट्‌स करण्यात येत आहे. या आधीही कपल फोटो चॅलेंज, आई व लहान बाळांचा फोटो चॅलेंज, पारंपरिक पोशाख चॅलेंज, स्पेक्ट चॅलेंज असे विविध प्रकारचे चॅलेंज आलेत. मात्र 'नथीची नखरा व 'फिरसे मुस्कुरायेगा इंडिया' सध्या सर्वत्र तुफान धुमाकूळ घालत असून याफोटोंवर सर्वात जास्त लाईक मिळत आहेत. टिकटॉकवरही युवतींनी आगळ्यावेगळ्या नथीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड अधिकच वाढत चालला आहे. जुने फोटो आणि बदललेला लुक पाहून सर्वजण एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. अश्या ऍक्‍टिविटीमुळे लॉकडाउनमध्ये वैतागलेल्या महिलांना एक वेगळाच आनंद मिळत आहे. 

'नथीची नखरा' का झाला इतका हिट 
नथ हा जरी पारंपरिक दागिना असला तरी महिलांमध्ये त्याचे एक वेगळे आकर्षण आहे. नथमुळे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे नथ हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उच्च वर्गीय बरोबरच जवळपास सर्वच महिलांजवळ विविध आकारामधील आकर्षित नथ असतात, त्यामुळेच 'नथीचा नखरा' या चॅलेंजला असंख्य महिलांनी ऍक्‍सेपटेड केलं व त्यामुळे 'नथीची नखरा' हा ट्रेण्ड सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हिट झाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar lockdown girl makeup nath and photo shut mobile