नागरिकांनो, सूट शासनाने दिली, कोरोनाने नव्हे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

जिल्ह्यात नियंत्रणात असलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शासन -प्रशासन हादरले. महाराष्ट्राचा प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोना संसर्गा कमी अधिक प्रमाणात पोचला आहे. नंदुरबार जिल्हा अत्यंत सुरक्षित मानला जात होता.

नंदुरबार : कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. सुप्त कारवाया करणाऱ्या शत्रूसारखा कोरोना माणसाच्या जीवनाशी खेळत आहे. मात्र नागरिक अत्यंत बिनधास्त वागताहेत. शासनाने २२ मे पासून सूट दिली असली तरी नागरिकांनो लक्षात ठेवा, कोरोनाने सूट दिलेली नाही. त्यामुळे आपले जीवन-मरण आता आपल्या हाती आहे, दक्षता घ्याल तर बरे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. 

जिल्ह्यात नियंत्रणात असलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शासन -प्रशासन हादरले. महाराष्ट्राचा प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोना संसर्गा कमी अधिक प्रमाणात पोचला आहे. नंदुरबार जिल्हा अत्यंत सुरक्षित मानला जात होता. तरीही त्या मानवतेचा शत्रू कोरोनाने नंदुरबार मध्ये शिरकाव केलाच. आज नाही म्हटले तरी ३० रूग्ण सापडले. पहिल्या टप्यातील रूग्ण बरे झाले. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद २४ तासाताच मावळला. दुसऱ्या दिवशी रजाळे येथील ६६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉजिटिव्ह आला. तेवढ्यावरच थांबले नाही. तर त्याचा कुटुंबातील पाच जणांनाही संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापाठोपाठ शिंदखेड्याचा एकास येथे तपासले असता त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तन-मन धनाने रूग्ण सेवा करणाऱ्या जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने सोडले नाही. आज कोरोनामुक्त जिल्हा झाल्यावरही दोन दिवसात कोरोनाचे ९ रूग्ण झाले. जिल्हा पुन्हा कोरोनासंसंर्गित झाला. 

शासन-प्रशासन आणि माध्यमांनी जनहितासाठी तीन महिने प्रयत्न केले. आता किती वेळ ते जनतेला घरी बसवतील. रोजगार बुडवतील. उपाशीपोटी लोकांना घरी किती दिवस बसवणार. त्यामुऴे शासनानेही काही बंधने शिथिल केले आहेत. मात्र कोरोना संपला म्हणून नव्हे तर आता लोक कोरोनापासून बचाव करण्याइतपत शहाणे झालेत, असे सरकारला वाटतय म्हणून. म्हणजे इथून पुढे जे संपूर्ण खबरदारी घेतील तेच वाचतील व अतिशहाण्यांचे काय होईल हे सांगायलाच नको. म्हणून करो या मरो अशीच परिस्थिती राहील. तुमचे जीवन तुमच्या हाती आहे. एक लक्षात ठेवा. सूट शासनाने दिली आहे कोरोनाने नाही. त्यामुळे एवढे बिनधास्त होऊ नका, प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ द्या, नियमांचे पालन करा, गर्दी टाळा, फिजिकल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन ‘सकाळ' माध्यम समूहातर्फे करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar lockdwon open market but corona virus