esakal | अर्थसंकल्प : नंदुरबारच्या मेडिकल कॉलेज साठी हवेत 160 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्प : नंदुरबारच्या मेडिकल कॉलेज साठी हवेत 160 कोटी

जिल्हा रुग्णालयात त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे महाविद्यालयासाठी लागणारा कर्मचाऱ्यांचे पथक, कक्ष सज्ज झाला आहे. केंद्रीय समिती कडून काढण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प : नंदुरबारच्या मेडिकल कॉलेज साठी हवेत 160 कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार :  येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या विविध निर्मानाधीन बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालयात त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे महाविद्यालयासाठी लागणारा कर्मचाऱ्यांचे पथक, कक्ष सज्ज झाला आहे. केंद्रीय समिती कडून काढण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. डिन व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच प्राध्यापकांच्या जागा सरळ भरती करण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 

हेपण पहा - माऊलींची ज्ञानेश्‍वरी हिंदीत; सत्तरीत ज्येष्ठ कवीचा प्रयत्न 

प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता 
जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयातील हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या 500 बेडसह आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत, इमारतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे, येत्या जूनपासून  येथील वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या बॅचची प्रवेश प्रक्रिया होईल. व वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल,

160 कोटी हवेत
दरम्यान महिनाभरापूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड के सी पाडवी यांनी व खासदार डॉ. हिना गावित यांनी या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी ग्वाही दिली होती काही अंशी निधीची अडचण आहे साधारण 160 कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार आहेत ते मिळाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज व इमारतीसह इतर बाबींची पूर्तता होण्यास मदत होणार आहे .वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज एकंदरीत 80 टक्के पूर्णत्वाकडे आले आहे त्यामुळे जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.