esakal | वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून 195 कोटी 
sakal

बोलून बातमी शोधा

heena gavit

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, हे डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वप्न होते. त्यामुळे ते स्वतः वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना, त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली होती. त्या प्रक्रियेला वेग आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी टोकर तलाव शिवारातील 16.63 हेक्‍टर जागेवर बांधकाम केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून 195 कोटी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारने 195 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या वर्षी महाराष्ट्रातून एकमेव नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयास निधी मंजूर झाला आहे. लॉकडाउन संपताच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास वेग येणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी शुक्रवारी (ता. 3) दिली. 
खासदार डॉ. गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित उपस्थित होते. 
खासदार डॉ. गावित म्हणाल्या, की नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे, हे डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वप्न होते. त्यामुळे ते स्वतः वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना, त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली होती. त्या प्रक्रियेला वेग आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी टोकर तलाव शिवारातील 16.63 हेक्‍टर जागेवर बांधकाम केले आहे. महाविद्यालयासाठी 325 कोटी खर्च आहे. त्यात 60 टक्के केंद्राचा म्हणजे 195 कोटी, तर राज्याचा 40 टक्के म्हणजे 130 कोटींचा सहभाग आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीत नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीस मंजुरी दिली आहे. अनेक त्रुट्या दूर करीत महाविद्यालय सुरू होण्याचा मार्गावर आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी रुग्णालय आवश्‍यक आहे. ती प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जिल्हा रुग्णालय या महाविद्यालयास जोडले आहे. रुग्णालयासाठी आवश्‍यक असलेले अधिकारी व कर्मचारी वर्गात 180 जणांना डेपोटेशनवर आणले आहे. इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी पहिल्या वर्षासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध आहेत. डीपीडीसीकडून मिळालेल्या एक कोटी 53 लाखांत पुस्तके, लॅब आदी साहित्य सज्ज केले आहे. लवकरच लेटर ऑफ परमिशन केंद्र सरकारकडून मिळेल. त्यानंतर तत्काळ वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल. 
 
कोरोना टेस्टिंग लॅब सुरू होणार 
नंदुरबार येथेही कोरोना स्वॅबच्या तपासणीसाठी पाठपुरावा केला होता. त्या लॅबला मंजुरी मिळाली आहे. दोन-चार दिवसांत ती लॅब सुरू होईल. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. तत्काळ रिपोर्ट मिळतील, असेही खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले.