esakal | लसीकरणाची तयारी..तालुक्‍याला ४ पथके नियुक्त करा
sakal

बोलून बातमी शोधा

collector rajendra bharud

लसीकरणाची तयारी..तालुक्‍याला ४ पथके नियुक्त करा

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : दुर्गम भागातील १८ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी गावपातळीवरील सूक्ष्म नियोजन करावे आणि मोहिम स्तरावर लसीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन तर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ४ पथकांची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.

अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, प्र. तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजेश शिंटे आदी उपस्थित होते.

पथकात असणार शिक्षकही

डॉ. भारुड म्हणाले, लसीकरणासाठी प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, २ परिचारीका आणि दोन शिक्षकांची नियुक्ती करावी. शिक्षकांनी जनतेच्या मनातील शंकांचे निरसन करून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यातील पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होईल यानुसार नियोजन करावे. येत्या १ मेपासून १८ वर्षावरील ‍व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

शंभर टक्‍केचे उद्दीष्‍ट ठेवा

जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्याचे काम केंद्र प्रमुखांनी सुरू करावे. तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील आदी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. श्री. गावडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी एकत्रिपणे गावतपाळीवरील नियेाजन करावे. परस्पर समन्वय साधून अधिकाधिक प्रमाणात लसीकरण होईल, यादृष्टीने प्रयत्न करावे. लसीकरणाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यात यावी.

loading image