esakal | उसाच्या शेतात आढळला तरूणीचा मृतदेह; खुनाचे कारण अस्पष्‍ट
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar crime murder case

उसाच्या शेतात आढळला तरूणीचा मृतदेह; खुनाचे कारण अस्पष्‍ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

म्हसावद (नंदुरबार) : उमर्टी (ता. शहादा) येथील अठरा वर्षीय तरुणीचा खून झाला असून मृतदेह गावाजवळ असलेल्‍या उसाचा शेतात (Farm) फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. याबाबत म्हसावद पोलिसात खुनाचा (Murder case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nandurbar news crime news young girl murder case)

हेही वाचा: पोलिसाची इस्त्रीवाल्यास पिस्तुलीने उडवण्याची धमकी

ऊमर्टी (ता. शहादा) येथील तरुणी लक्ष्मी युवराज ठाकरे (वय १८) हिचा मृतदेह उमर्टी शिवारात मोहन जाधव, पुंजरू जाधव यांच्या गट नंबर ५३ उसाच्या शेतात आढळून आला. तरुणीच्या अंगावर चांदीचे दागिने होते. गळ्यातील चांदीची साखळी काढून नेली. मात्र हातातील दाग- दागिने काढायचा प्रयत्न आरोपीने केल्याचे समजते. खून हा चोरीच्या उद्देशाने झाला की प्रेम प्रकरणातून झाला हे कारण समजू शकले नाही.

दगडाने मारहाण

मृत तरुणीचा डोक्यावर, तोंडावर आणि कानाजवळ दगडाने दुखापत करून जीवे ठार मारून फेकून दिले. याबाबत मृताची आई जिजाबाई ठाकर (वय ३६) हिचे फिर्यादीवरून संशयित आरोपी दिलीप तुंबा चोंगळे (रा. उमर्टी) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून संशयित आरोपी फरार आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलिस उपनिरीक्षक सुनील बिराडे हे पुढील तपास करीत आहे.

loading image
go to top