इंग्रजांचे दगड सांभाळून उपयोग नाही...स्टेशन मॉडर्न व्हावेच 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दुहेरी लाईनमुळे छोटे-छोटे स्टेशन भव्य-दिव्य झालेत, पण नंदुरबारला मुख्य थांबा असूनही जुनीच इमारत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे लक्षात आले आहे. या जुन्या इमारतीत कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. 

नंदुरबार : नंदुरबार रेल्वेस्थानक मॉडर्न झाले पाहिजे. निव्वळ इंग्रजांचे दगडं सांभाळून उपयोग नाही. भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांचा विचार झाला पाहिजे. ताप्ती लाईनवर रोजच्या असंख्य रेल्वेगाड्या धावत असतात. भविष्याचा विचार न करता मॉडर्न रेल्वे स्टेशनला स्थगिती देण्याचा निर्णय चुकीचा असून मॉडर्न स्टेशन झाले पाहिजे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे. 

सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दुहेरी लाईनमुळे छोटे-छोटे स्टेशन भव्य-दिव्य झालेत, पण नंदुरबारला मुख्य थांबा असूनही जुनीच इमारत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे लक्षात आले आहे. या जुन्या इमारतीत कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. 

नक्‍की पहा - मुलीच्या विवाहाचा आनंद क्षणात विरला...कुटूंबातील दहा जणांवर काळाचा घाला 

लहान खिडकी अन्‌ वेटींग रूम
तिकीट खिडकी अत्यंत लहान असून जनरल वेटींग रुम पूर्ण नसल्याने तसेच बुकींग ऑफीस, महिलांना शौचालय, व्हीआयपी वेटींग रुम यांची जागा आज पूर्णपणे अयोग्य आहे. भविष्याचा विचार करुन नवीन रेल्वे स्टेशन बनविणे काळाची गरज आहे. निव्वळ हेरिटेजच्या नावाखाली इंग्रजांचे दगडं सांभाळत बसण्यात अर्थ नाही. आजच्या इमारतीच्या भिंती पाहिल्या तर दोन-दोन फुटाच्या आहेत. हे तोडून नवीन बनविल्या तर एकाच जागेवर सर्व सुविधा उपलब्ध होतील व कायद्याचे पालन केले जाईल. 

तर जुन्या इमारतीला आकार द्या
जुन्या इमारतीला ठेवणे म्हणजे भविष्यात प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना रोज अडचणीचा मुकाबला करणे होय. ही इमारत नवीन बनविली तर शंभर वर्षांपर्यंत प्रवाशांना व कर्मचार्‍यांना त्रास होणार नाही. हेरिटेजच ठेवायचे असेल तर नन्या इमारतीला तसा आकार किवा तशी डिझाईन द्यावी. परंतु निव्वळ भावनाशिल मुद्दा न करता व्यवहारिक सांगड घालावी व नवीन रेल्वे स्टेशन सर्व सुविधांयुक्त असावे असे पत्र प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिंपी रेल्वे विभागाला दिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar railway station modern gajendra shimpi