नंदुरबार जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर 

धनराज माळी
Saturday, 30 January 2021

शहादा-नंदुरबार तालुक्यातील बिगरआदिवासी क्षेत्रातील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत त्या -त्या तहसील कार्यालयात काढली.

नंदुरबार : बिगरआदिवासी क्षेत्रातील नंदुरबार तालुक्यातील ४१ व शहादा तालुक्यातील ३५ अशा एकूण ७६ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण काढले. तर आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे आरक्षण लवकरच काढणार आहे. आजच्या आरक्षणात ‘कही खुशी, कही गम’ याप्रमाणे चित्र आहे. अनेक ठिकाणी आरक्षण बदलामुळे सरपंचपदाची संधी हुकली, तर अनेकांना अनपेक्षितपणे सरपंच होण्याची संधी चालून आली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर साऱ्यांना सरपंचपदाच्या आरक्षणाची आतुरता लागली होती. त्यानुसार शहादा-नंदुरबार तालुक्यातील बिगरआदिवासी क्षेत्रातील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत त्या -त्या तहसील कार्यालयात काढली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. 

नंदुरबार तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वसुमना पंत व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला ईश्‍वर चिठ्ठीद्वारे आरक्षण काढले. या वेळी नायब तहसीलदार बी. ओ. बोरसे, संदीप वाडीले आदी उपस्थित होते. 

नंदुरबार तालुका आरक्षण असे ः 
यात खुला प्रवर्गासाठी : हाटमोहिदा, बोराळे, सातुर्खे, ओसर्ली, तीस, होळतर्फे रनाळे, समशेरपूर, कानळदे, नाशिंदे, आराळे, कार्ली, निंभेल, काकर्दे, विखरण, बलवंड, बहयाणे, सैताणे, कलमाडी, रजाळे, कंढे, शिंदगव्हाण, भालेर, रनाळे, मांजरे, खोंडामळी, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, आसाणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबिसी) : तलवाडे बु., अमळथे, कोपर्ली, तिलाली, बलदाणे, भादवड, नगाव, खोक्राळे, वैंदाणे, घोटाणे, खर्दे- खुर्द या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. न्याहली अनुसूचित जाती व जून मोहिदा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाले. 

शहादा तालुक्‍यात अनेकांचा हिरमोड 
शहादा तालुक्यातील १५० पैकी ३५ ग्रामपंचायतींच्या २०२०- २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीतील सरपंच पदासाठी शुक्रवारी (ता. २९) आरक्षण सोडत काढली. आरक्षण सोडतीनंतर गावांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या इच्छेप्रमाणे आरक्षण निघाले नसल्याने हिरमोड झाला. तहसील कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत प्रक्रिया पार पडली. या वेळी तालुक्यातील विविध गावांतून भावी इच्छुक सरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ३५ पैकी अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दहा असे आरक्षण निघाले. २२ गावांत सर्वसाधारण सरपंच होतील. 

ग्रामपंचायतनिहाय आरक्षण : 
अनुसूचित जाती- पुसनद, अनुसूचित जमाती- टेंभे त.श., कुऱ्हावद त.सा., नागरिकांचा मागास प्रवर्ग- कौठळ त.सा., सोनवद त.श., बामखेडा त.सा., करजई, डामरखेडा, ससदे, दोंदवाडे, शिरुडदिगर, नांदरखेडा, पुरुषोत्तमनगर. सर्वसाधारण- अनरद, कळंबु, कानडी त.श., कुकावल, खैरवे- भडगाव, टेंभे त.सा, तोरखेडा, देऊर- कमखेडा, पळासवाडा, फेस, बामखेडा त.त., बिलाडी त.सा., मनरद, मोहिदे त.श, लांबोळा, वरुळ त.श., वरढे त.श, शेल्टी, सारंगखेडा, सावळदा, हिंगणी, कोठली त.सा. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar sarpanch reservation gram panchayats nandurbar district announced