अखेर सातपुड्यातही कोरोनाचा शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मंगळवारी दुपारी अहवाल जाहीर केला. त्यात पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील ३२ वर्षीय पुरुष, राजीव गांधीनगरमधील ३८ वर्षीय पुरुष, अक्कलकुवा पोलिस वसाहतीतील ७५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक व गेंदामाळ (ता. धडगाव) येथील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नंदुरबार : सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुका आतापर्यंत कोरोनापासून कोसो दूर होता. मात्र मंगळवारी (ता. ७) धडगाव तालुक्यातील गेंदामाळा पो. चिखली येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सातपुड्यातही आता त्या व्यक्तीच्या रूपाने कोरोनाने शिरकाव केला आहे अन्यथा आदिवासी जीवनशैलीमुळे सातपुड्यात चार महिने कोरोना शिरू शकलेला नव्हता. 
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मंगळवारी दुपारी अहवाल जाहीर केला. त्यात पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील ३२ वर्षीय पुरुष, राजीव गांधीनगरमधील ३८ वर्षीय पुरुष, अक्कलकुवा पोलिस वसाहतीतील ७५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक व गेंदामाळ (ता. धडगाव) येथील ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा १९५ झाला आहे. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात ४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आजअखेर १६० रुग्णांचे स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. 

धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात नाममात्र रुग्ण 
पहिल्या टप्प्यात ज्या वेळेस कोरोनाच्या संसर्गाला सुरवात झाली त्या वेळेस अक्कलकुवा शहरात टप्प्याटप्प्याने सात रुग्ण आढळून आले. त्यानंतर अतिदुर्गम भाग असलेल्या मोलगी येथे एका व्यापाऱ्याला लागण झाली होती. तो रुग्ण बरा झाला आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यातील पाच जणांना संसर्ग झाला. त्यांना क्वारंटाइन केले आहे. असे असले तरी सातपुड्याच्या कुशीतील धडगाव तालुक्यात चार महिन्यांत एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र गेंदामाळ या अतिदुर्गम पाड्यात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या रूपाने सातपुड्यात अखेर कोरोनाने एंट्री केलीच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar satpuda aadivashi aria corona virus entry