esakal | नंदुरबारात दोन गटात दगडफेक, एकाचा खून 
sakal

बोलून बातमी शोधा

Stone throwing in two groups

पतंग उडविण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाची कुरापत काढून लियाकत शाहिद बागवान यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप घेवून घरात प्रवेश करत त्यांना बाहेर ओढत अंगणात आणले. तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. 

नंदुरबारात दोन गटात दगडफेक, एकाचा खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शहरातील जुना बैल बाजार परिसरात पतंग उडविण्याच्या कारणावरुन वाद होवून दोन गटात दंगल झाली. यात ६० वर्षीय व्यक्तिचा दगडाने ठेचून खून झाला. दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.१२) रात्री साडेनऊला शहरातील जुना बैल बाजार परिसरात शाहरुख शेख कलीम पटवे, नईम शेख कालीम पटवे, समीर शेख कलीम पटवे, अल्लमश शेख कलीम पटवे, मोहसिन कलीम पटवे, अलीशानबानो शेख कासम पटवे, नाजीम शेख कलीम पटवे, अत्तार शेख सलमान शेख मन्नान, शेख सलीम अबुल हसन ऊर्फ मुन्ना इसाक पटवे, कलीम पटवे, सना फिरोज पटवे, शेख नुशरतबानो शेख सलीम ऊर्फ मुन्ना पटवे (सर्व रा. लक्कड़कोट, जुना बैल बाजार अलीसाहब मोहल्ला, नंदुरबार) यांनी पतंग उडविण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाची कुरापत काढून लियाकत शाहिद बागवान यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप घेवून घरात प्रवेश करत त्यांना बाहेर ओढत अंगणात आणले. तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. 

छातीत मारला दगड
बागवान यांचे मामा हारुन युसूफ कुरेशी यांना अल्तमश, कलिम, नईम, समीर, मोहसीन, मुन्ना यांनी धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडले व बाजुलाच असलेला दगड उचलून हारुन कुरेशी याच्या छातीवर मारल्यामुळे बेशुद्ध पडले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी अंगणात उभ्या असलेल्या मोटारसायकलींची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच शिवीगाळ करुन लियाकत शाहिद बागवान यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारा जणांविरुद्ध खून, दंगलीसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या गटाचीही तक्रार
दरम्यान, दुसऱ्या गटाने दिलेल्या फियार्दीत अरबाज, समीर, युनूस, लियाकत बागवान, हारुणची पत्नी, हारुणची बहिण, अज्ञात मुलगा यांनी पतंग उडविण्याच्या कारणावरुन शेख कलिम शेख कासम पटवे यांच्या राहत्या घरात घुसून अरबाज व समीर यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण करुन दुखापत केली. तसेच त्यांचा मुलगा मौसिक यास युनूस व अज्ञात मुलाने कपाळावर हातातील लोखंडी पाईपने मारुन जीवघेणा हल्ला केला. हारुणची पत्नी व बहिण यांनी शेख कलीमच्या पत्नीस हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लियाकत बागवान याने भडकावून शेख कलीम, त्याची पत्नी व मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला. यात शेख कलीम व मौसिम कलीम पटले हे जखमी झाले आहेत. याबाबत सात जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील पुढील तपास करीत आहेत.