शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अभ्यासगटाची नेमणूक

अभ्यास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञ मंडळींचा अभ्यासगट गठित केला आहे.
School
School


तळोदा ः महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या (Primary and secondary schools of Zilla Parishad) शैक्षणिक दर्जांमध्ये (Academic standards) सुधारणा करण्याकरिता शासनाने अभ्यासगट गठित केला असून, हा अभ्यासगट दिल्ली निगमअंतर्गत येणाऱ्या शाळांना भेट देत, सखोल अभ्यास करीत त्याबाबतचा अहवाल ग्रामविकास विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री यांना सादर करणार आहेत. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आणखीन सुविधा व उच्च दर्जाचे तंत्रज्ञान (High quality technology) उपलब्ध होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

School
धुळे महापौर आज निवड: एकदा मत दिल्यानंतर बदल नाही



महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झालेली असून, त्याचे सकारात्मक परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवर दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळांनी आयएसओ मानांकनदेखील प्राप्त केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिकाधिक सुधारणा होणे, विद्यार्थ्यांना जगातील सर्व तंत्रज्ञानासह शिक्षण देणे यांसारख्या बाबीदेखील जागतिकीकरणाच्या काळामध्ये आवश्यक आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारच्या दिल्ली निगमअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये काळानुरूप शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झालेल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, सुविधा व इतर शैक्षणिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञ मंडळींचा अभ्यासगट गठित केला आहे. हा अभ्यासगट सखोल अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल ग्रामविकास विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री यांना सादर करणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये आणखीन सुधारणा होत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, सुविधा उपलब्ध होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

School
कच्छमधील या सुंदर ठिकाणांना आवश्य भेट द्या..


अभ्यासगटातील सदस्य
अभ्यासगटात औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, औरंगाबादचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, निवृत्त विशेष लेखापरीक्षक आर. एस. शेख, फर्दापूर (ता. सोयगाव) येथील माणिकराव पालोदकर विद्यालयाचे सहशिक्षक काशीनाथ पाटील, राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, वरूर (ता. सिल्लोड) येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक जगन सुरसे आणि वडगाव कोण्हाटी (जि. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांचा समावेश आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com