esakal | शासकीय निवासाची सोय नसल्याने पोलिसांना खासगी खोली घेण्याची आली वेळ !
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय निवासाची सोय नसल्याने पोलिसांना खासगी खोली घेण्याची आली वेळ !

स्थानिक ठिकाणी राहण्यासाठी निवासाची सोय नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना इतरत्र ठिकाणाहून यावं लागते. अशा परिस्थितीत स्थानिक ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्यास कर्तव्य बजावण्यास तत्परता दाखवता येईल

शासकीय निवासाची सोय नसल्याने पोलिसांना खासगी खोली घेण्याची आली वेळ !

sakal_logo
By
बळवंत बोरसे

विसरवाडी  ः विसरवाडी येथील पोलिसांसाठी निवासी सोय नसल्याने नंदुरबारहून व खासगी खोल घेत राहण्याची वेळ आली आहे. कित्येक वर्षापासून त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. निधी मंजूर असून अद्याप बांधकामाचा मुहूर्त मिळत नसल्याने नक्की पाणी कुठे मुरते आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची निवासाची सोय करून शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

विसरवाडी पोलिस ठाण्यांतर्गत सर्वाधिक ४ गावे येतात. खांडबारा डोगेगाव दूरक्षेत्र पोलिस ठाण्यास जोडलेले आहे. सध्या विसरवाडी पोलिस ठाण्यात ३३ कर्मचारी कार्यरत आहे. लहान मोठ्या चोऱ्या, राष्ट्रीय महामार्गावर अपघात, राजकीय वादातून गुन्हे यामुळे पोलिसांना सतत कार्यरत राहावे लागते. त्यामुळे पोलिसांना सतत सतर्क राहावं लागते.अशावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना धावपळ करून जबाबदारी पार पाडावी लागते. स्थानिक ठिकाणी राहण्यासाठी निवासाची सोय नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना इतरत्र ठिकाणाहून यावं लागते. अशा परिस्थितीत स्थानिक ठिकाणी राहण्याची व्यवस्था असल्यास कर्तव्य बजावण्यास तत्परता दाखवता येईल व समाजासाठी पोलिसांचा दुवा समजला जाईल. गंभीर परिस्थिती उद्भवल्यास सर्वच पोलिसांना सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी लागते. कुटुंबाला सोडून सेवा देण्यास भाग पडते.

त्यामुळे स्थानिक ठिकाणी राहण्याची व्यवस्था व निवासाची सोय झाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांना अधिक उत्तम सेवा देता येईल. प्रशासनाने दखल घेऊन स्थानिक ठिकाणी निवासाची सोय व्हावी अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे